परदेशी विद्यापीठांच्या ऑनलाइन अभ्यासक्रमांना बंदी
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने नुकतीच परदेशी विद्यापीठांसाठी देशात कॅम्पस सुरू करण्यासाठी नियमावली प्रसिद्ध केली आहे. त्यानंतर आता यूजीसीकडून एक नवीन अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यानुसार ऑनलाइन अभ्यासक्रमाची फसवी जाहिरात करणार्या परदेशी विद्यापीठांवर आणि जाहिरात देणार्यांवर नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा यूजीसीने दिला आहे.
यूजीसीचे सचिव मनीष जोशी यांनी परिपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, काही एडटेक कंपन्या, काही परदेशी विद्यापीठे विविध संस्थांच्या सहकार्याने वृत्तपत्रे / सोशल मीडिया / टेलिव्हिजन इत्यादींवर ऑनलाइन पद्धतीने पदवी आणि पदविका कार्यक्रम ऑफर करणार्या जाहिराती करत असल्याचे लक्षात आले आहे. अशा फ—ँचायझी व्यवस्थेला परवानगी नाही. तसेच असा कोणताही कार्यक्रम, पदवी यूजीसीद्वारे मान्यताप्राप्त होणार नाही.
सर्व फसव्या एडटेक कंपन्यांवर तसेच त्यांच्या एचईएलवर नियमानुसार कारवाई केली जाईल. असे यूजीसीने स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी आणि जनतेला याबाबत जागरूक राहण्याचा सल्ला यूजीसीने दिला आहे.
आयोगाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतीही परदेशी उच्च शैक्षणिक संस्था भारतात कोणताही अभ्यासक्रम देऊ शकणार नाही. हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट कोणत्याही फ—ँचायझी व्यवस्थेअंतर्गत अभ्यासक देऊ शकता नाही. तसेच अशा अभ्यासक्रमांना यूजीसीद्वारे मान्यता दिली जाणार नाही, असेही यूजीसीने आपल्या अधिसूचनेत स्पष्ट केले आहे.
होही वाचा
नवीन अध्यक्षांसह सदस्यांच्या बैठकीची जागा हलली; नागपुरात होणार बैठक
शिखर बँक घोटाळ्याच्या तपासाचा प्रगत अहवाल द्या
शिवाजी विद्यापीठाच्या संशोधन मंडळावर निपुण कोरे यांची नियुक्ती
The post परदेशी विद्यापीठांच्या ऑनलाइन अभ्यासक्रमांना बंदी appeared first on Bharat Live News Media.