मराठा आरक्षणप्रश्नी आणखी थोडा वेळ वाढवून द्या : जरांगे-पाटील यांच्याकडे शिष्टमंडळाची मागणी
पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणप्रश्नी आज (दि. १६) राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या शिष्टमंडळाने गॅलेक्सी रुग्णालयात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. दरम्यान सरकारकडून जरांगे-पाटील यांना आरक्षप्रश्नासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी केली.
जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षप्रश्नी सरकारला २४ डिसेंबर हा अल्टिमेटम दिलेला होता. त्यानंतर काल (दि. १५) १७ तारखेला सरकारने आपली भुमिका मांडावी असे स्पष्टपणे सांगितले होते. दरम्यान १७ तारखेला पुढील आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचे देखील सांगण्यात आले. शिष्टमंडळासोबत चर्चा करत असताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला दिलेली वेळ आता सरकारने पाळलीच पाहिजे. तसेच गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारने दिलेला शब्दही पाळला पाहिजे.
यावर मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, आरक्षणाच्या विषयावर जरांगे पाटील यांनी जरा सबुरीने घ्यावे, २४ डिसेंबरच्या अल्टिमेटम बाबत विचार करावा, सरकार आरक्षणाच्या बाबतीत काम करत आहे. २४ म्हणजे २४ तारीख धरून बसू नये. थोडे मागेपुढे होईल पण सरकार मराठा समाजाला आरक्षण देईलच असा विश्वास महाजन यांनी जरांगे पाटील यांना दिला.
पुढे महाजन म्हणाले की, सरकार मराठा समाजाला १०० टक्के टिकणारे आरक्षण देईल. आरक्षणाबाबत काम वेगानं सुरु आहे. सरकारच्या कामावर जरांगे पाटील यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे. मराठा समाजाला जे हक्काचं आहे ते मिळणारच. मराठा आरक्षणाबाबतचे काम अंतिम टप्प्यात असल्याचेही महाजन यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा
मराठा आरक्षण : ‘१७ डिसेंबर सरकारसाठी पुन्हा नवा अल्टिमेटम’ ; जरांगे-पाटील ठरवणार रणनीती
नांदेड : मराठा आरक्षणाचा विषय अंतिम टप्प्यात : जरांगे पाटील
ओबीसी बांधवांनो, मराठ्यांना तुमच्या पाठबळाची गरज : मनोज जरांगे पाटील
The post मराठा आरक्षणप्रश्नी आणखी थोडा वेळ वाढवून द्या : जरांगे-पाटील यांच्याकडे शिष्टमंडळाची मागणी appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणप्रश्नी आज (दि. १६) राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या शिष्टमंडळाने गॅलेक्सी रुग्णालयात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. दरम्यान सरकारकडून जरांगे-पाटील यांना आरक्षप्रश्नासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी केली. जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षप्रश्नी सरकारला २४ डिसेंबर हा अल्टिमेटम दिलेला होता. त्यानंतर काल (दि. १५) …
The post मराठा आरक्षणप्रश्नी आणखी थोडा वेळ वाढवून द्या : जरांगे-पाटील यांच्याकडे शिष्टमंडळाची मागणी appeared first on पुढारी.