छ. संभाजीनगर : ’बीई’ ’सिव्हील’चा पेपर फुटला; हालगे महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द

पैठण, पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभियांत्रिकी पेपर फुटी प्रकरणी नागनाथअप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आले आहे. तसेच बी.ई. (सिव्हील) अभ्यासक्रमाचा संबधित पेपरही रद्द करण्यात आला आहे. तसेच प्राचार्य व परीक्षा समन्वयकांच्या विरोधात ’एफआयआर’ दाखल करण्याचे आदेश कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी दिले आहेत. Chh. Sambhajinagar डॉ. बाबासाहेब आंबेडकर … The post छ. संभाजीनगर : ’बीई’ ’सिव्हील’चा पेपर फुटला; हालगे महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द appeared first on पुढारी.

छ. संभाजीनगर : ’बीई’ ’सिव्हील’चा पेपर फुटला; हालगे महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द

पैठण, पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभियांत्रिकी पेपर फुटी प्रकरणी नागनाथअप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आले आहे. तसेच बी.ई. (सिव्हील) अभ्यासक्रमाचा संबधित पेपरही रद्द करण्यात आला आहे. तसेच प्राचार्य व परीक्षा समन्वयकांच्या विरोधात ’एफआयआर’ दाखल करण्याचे आदेश कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी दिले आहेत. Chh. Sambhajinagar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या परीक्षा १२ डिसेंबरपासून सुरु झाल्या आहेत. या परीक्षेत पाचव्या दिवशी दुपारच्या सत्रात बी.ई सिव्हील अंतिम वर्षाचा डिझाईन ऑफ स्ट्रक्चर (थ्री) हा पेपर दोन वाजता सुरू होणार होता. संबंधित पेपर समाजमाध्यमावर लिंक झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी तत्काळ दखल घेऊन परीक्षा विभागास चौकशीचे आदेश दिले. Chh. Sambhajinagar
संबधित प्रश्नपत्रिका परळी येथील नागनाथअप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केंद्रावरुन १ वाजून ८ मिनिटे व २२ सेकंदांनी ’डाऊनलोड’ करण्यात आली. तर १ वाजून ११ मिनिटांनी हा पेपर समाज माध्यमांवर लिक झाला. ही माहिती समजताच कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी संबधित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.भास्करराव व परीक्षाप्रमुख समन्वयक डॉ.ए.बी.चाटे यांच्या विरोधात पोलिसांत ’एफआयआर’ दाखल करण्याचे आदेश परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.भारती गवळी यांना दिले आहेत.
परीक्षांत गैरप्रकार खपवून घेणार नाही : कुलगुरु
आभियांत्रिकी परीक्षेतील हा गैरप्रकार विद्यापीठ प्रशासन अजिबात खपवून घेणार नाही. संबधित महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आले असून जवळच्या केंद्रावर परीक्षा केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांचे स्थालंतर करण्यात येईल, अशी माहिती कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिली.
चार महाविद्यालये, ७९ विद्यार्थी
विद्यापीठाशी संलग्नित नागनाथअप्पा हालगे आभियांत्रिकी महाविद्यालय परळी वैजनाथ, आयसीईम व एव्हरेस्ट महाविद्यालय (छत्रपती संभाजीनगर) व के.टी.पाटील महाविद्यालय धाराशिव हे चार केंद्र असून एकूण ७९ विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत. संबधित रद्द झालेला पेपर नंतर घेण्यात येणार आहे.
हेही वाचा 

छ.संभाजीनगर : अज्ञात वाहनाच्या धडकेत पिंपळदरी येथील दुचाकीस्वार जागीच ठार
छ.संभाजीनगर: कारकीन येथे कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीचा खून; पतीला अटक
छ.संभाजीनगर: मोटारसायकल घसरून हतनुर येथील तरूण ठार

The post छ. संभाजीनगर : ’बीई’ ’सिव्हील’चा पेपर फुटला; हालगे महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द appeared first on पुढारी.

पैठण, पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभियांत्रिकी पेपर फुटी प्रकरणी नागनाथअप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आले आहे. तसेच बी.ई. (सिव्हील) अभ्यासक्रमाचा संबधित पेपरही रद्द करण्यात आला आहे. तसेच प्राचार्य व परीक्षा समन्वयकांच्या विरोधात ’एफआयआर’ दाखल करण्याचे आदेश कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी दिले आहेत. Chh. Sambhajinagar डॉ. बाबासाहेब आंबेडकर …

The post छ. संभाजीनगर : ’बीई’ ’सिव्हील’चा पेपर फुटला; हालगे महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द appeared first on पुढारी.

Go to Source