नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ट्रीप प्लॅन करताय ? हे आहेत सर्वोत्तम पर्याय
पुढारी ऑनलाईन : सरत्या वर्षाला निरोप देऊन येत्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकांचे भन्नाट प्लान असतात. काहीजण मित्रमैत्रिणींसोबत हे सेलिब्रेशन करणं पसंत करतात तर काहीजण कुटुंबासोबत हा वेळ घालवतात. पण येत्या वर्षात काही नवीन करण्याचं प्लॅनिंग करत असाल तर या पर्यटनस्थळांना जरूर भेट द्या.
कोर्बेट नॅशनल पार्क : वाइल्ड लाईफ प्रेमींसाठी हे ठिकाण म्हणजे पर्वणी आहे. उत्तराखंडमधील नैनिताल येथे हे पार्क स्थित आहे. या ठिकाणी वाघांच्या दर्शनासाठी लोक गर्दी करतात. याशिवाय या पार्कमध्ये तुम्हाला नीलगाय, सांबार, चीतळ यासारखे प्राणीही दिसतील. इथे गर्जिया देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. याशिवाय जंगलातील शांती, धबधबे तुमचं मन मोहून घेतील.
थेक्कडी : केरळ अनेक प्रसिद्ध ठिकाणांसाठी ओळखलं जातं. सुबक शहर आणि उत्तम हवा यामुळे तुमचं मन प्रफुल्ल होईल. याशिवाय येथील पेरियार नॅशनल पार्कदेखील आहे. याशिवाय पेरियार नदीवर राफ्टींग करण्याचा आनंदही घेऊ शकता.
चिकमंगलूर : निसर्गाच्या सानिध्यात कर्नाटकमधील या ठिकाणी तुम्ही नवीन वर्षाचे स्वागत करू शकतात. इथे ट्रेकिंग करू शकता. हेब्बे फॉल्स हे ठिकाण मुख्य शहरापासून 10 कि मी अंतरावर हे ठिकाण आहे. त्यामुळे ताण-तणावपासून दूर राहायचं असेल तर हा सर्वात उत्तम ऑप्शन आहे.
अलिबाग : महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय ठिकाण म्हणजे अलिबाग. साहसी समुद्री खेळासांठी अलिबाग फेमस आहे. कुलाबा किल्ला हा अलिबाग बस स्टँड पासून जवळपास 3 किमी वर हा किल्ला आहे. याठिकाणी तुम्ही निसर्गाच्या सनिध्यातील निवांतपणा आणि सी फूडचा आस्वाद घेता येऊ शकतो.
The post नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ट्रीप प्लॅन करताय ? हे आहेत सर्वोत्तम पर्याय appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन : सरत्या वर्षाला निरोप देऊन येत्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकांचे भन्नाट प्लान असतात. काहीजण मित्रमैत्रिणींसोबत हे सेलिब्रेशन करणं पसंत करतात तर काहीजण कुटुंबासोबत हा वेळ घालवतात. पण येत्या वर्षात काही नवीन करण्याचं प्लॅनिंग करत असाल तर या पर्यटनस्थळांना जरूर भेट द्या. कोर्बेट नॅशनल पार्क : वाइल्ड लाईफ प्रेमींसाठी हे ठिकाण म्हणजे पर्वणी आहे. …
The post नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ट्रीप प्लॅन करताय ? हे आहेत सर्वोत्तम पर्याय appeared first on पुढारी.