केरळमध्ये आढळला कोविड-१९ चा सबव्हेरियंट; कोरोनातून बऱ्या झालेल्या महिलेला झाले संक्रमण

पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळमध्ये कोविड-१९चा सबव्हेरियंट आढळला आहे. JN-1 असे या सबव्हेरियंटचे नाव आहे. आरटी-पीसीआर टेस्ट केली असता ८ डिसेंबर रोजी हा रुग्ण आढळला. एका महिलेला JN-1 चे संक्रमण झाले आहे. या महिलेला इन्फ्लूएंझा सारख्या आजाराची (ILI) सौम्य लक्षणे होती. शिवाय ती कोविड-19 मधून बरी झाली आहे. (Covid subvariant)
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना INSACOG प्रमुख एनके अरोरा यांनी सांगितले की, “या प्रकाराची नोंद नोव्हेंबरमध्ये झाली होती. हे BA.2.86 चा सबवेरियंट आहे. आमच्याकडे JN.1 ची काही रुग्ण आढळली आहेत. आतापर्यंत या व्हेरियंटचा कोणताही रुग्ण गंभीर असल्याची नोंद झालेली नाही.” (Covid subvariant)
सध्या देशात कोविड-19 चे 90 टक्क्यांहून अधिक प्रकरणे गंभीर नाहीत. संक्रमित लोक त्यांच्या घरात एकांतात राहत आहेत. यापूर्वी सिंगापूरमध्ये एका भारतीय प्रवाशाला JN.1 चा संसर्ग आढळून आला होता. हा माणूस मूळचा तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील रहिवासी असून 25 ऑक्टोबरला तो सिंगापूरला गेला होता. (Covid subvariant)
JN.1 चा या व्हेरियंटचा सिंगापूरमध्ये कहर (Covid subvariant)
सिंगापूरमध्ये कोविड-19 ची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे देशाच्या आरोग्य मंत्रालयाने लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, 3 ते 9 डिसेंबर दरम्यान, COVID-19 च्या कोविड प्रकरणांची संख्या 56,043 पर्यंत वाढली, जी गेल्या आठवड्यात 32,035 होती. रुग्णांमध्ये 75 टक्क्यांनी वाढ झाली आहे. (Covid subvariant)
Covid subvariant JN.1 case detected in Kerala, raises concerns
Read @ANI Story | https://t.co/o3Zi9atKE1#Corona #Kerala #JN1 pic.twitter.com/Vsm9XZdWxf
— ANI Digital (@ani_digital) December 16, 2023
हेही वाचलंत का?
Dhule Crime : कत्तलीसाठी बांधून ठेवली 50 गुरे, सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक
Rahul Gandhi On PM Modi: बेरोजगारी, महागाईमुळे ‘त्या’ तरुणांनी संसदेची सुरक्षा भेदली : राहुल गांधी
The post केरळमध्ये आढळला कोविड-१९ चा सबव्हेरियंट; कोरोनातून बऱ्या झालेल्या महिलेला झाले संक्रमण appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळमध्ये कोविड-१९चा सबव्हेरियंट आढळला आहे. JN-1 असे या सबव्हेरियंटचे नाव आहे. आरटी-पीसीआर टेस्ट केली असता ८ डिसेंबर रोजी हा रुग्ण आढळला. एका महिलेला JN-1 चे संक्रमण झाले आहे. या महिलेला इन्फ्लूएंझा सारख्या आजाराची (ILI) सौम्य लक्षणे होती. शिवाय ती कोविड-19 मधून बरी झाली आहे. (Covid subvariant) एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना INSACOG …
The post केरळमध्ये आढळला कोविड-१९ चा सबव्हेरियंट; कोरोनातून बऱ्या झालेल्या महिलेला झाले संक्रमण appeared first on पुढारी.
