PM मोदींना प्रश्न विचारण्याची सुवर्णसंधी; ‘परीक्षा पे चर्चा-2024’ साठी नाव नोंदणी सुरू

पुढारी ऑनलाईन डेस्क : pariksha pe charcha 2024 registration पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम सर्वपरिचित आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमामध्ये पीएम मोदींना प्रश्न विचारणे आणि संवाद साधण्यासाठी अर्ज मागविले आहेत. यासाठी शालेय विद्यार्थी उमेदवार शुक्रवार १२ जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील विद्यार्थ्यांना … The post PM मोदींना प्रश्न विचारण्याची सुवर्णसंधी; ‘परीक्षा पे चर्चा-2024’ साठी नाव नोंदणी सुरू appeared first on पुढारी.
PM मोदींना प्रश्न विचारण्याची सुवर्णसंधी; ‘परीक्षा पे चर्चा-2024’ साठी नाव नोंदणी सुरू


पुढारी ऑनलाईन डेस्क : pariksha pe charcha 2024 registration पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम सर्वपरिचित आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमामध्ये पीएम मोदींना प्रश्न विचारणे आणि संवाद साधण्यासाठी अर्ज मागविले आहेत. यासाठी शालेय विद्यार्थी उमेदवार शुक्रवार १२ जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. यासाठी https://innovateindia.mygov.in/ppc-2024/ या लिंकवर नाव नोंदणी करण्याचे आवाहन  भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने केले आहे. (Pariksha Pe Charcha 2024)
भारत सरकारने पुढे म्हटले आहे की, ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाद्वारे पीएम मोदी गेल्या काही वर्षांपासून देशातील शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. या कार्यक्रमाची ही ७ वी आवृत्ती आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील अनेक विद्यार्थ्यांना पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारण्याची तसेच संवाद साधण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त सल्ला देतात. या कार्यक्रमाद्वारे उमेदवारांना थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची आणि बक्षिसे जिंकण्याची संधी मिळते. (Pariksha Pe Charcha 2024)
Pariksha Pe Charcha 2024 : ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाचा उद्देश
भारतातील शालेय विद्यार्थ्यांना त्यांची स्वप्ने आणि उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मदत करणे. तसेच त्यांना सक्षम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाच्या माध्यमातून पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. तसेच “परीक्षेचा ताण सोडण्याची आणि सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा घेण्याची हीच वेळ आहे” असे देखील भारत सरकारने ‘परीक्षा पे चर्चा-2024’ संदर्भात म्हटले आहे.
नाव नोंदणी कोण करू शकते?
शिक्षण मंत्रालयाद्वारे जारी केलेल्या अधिसूचनेनुसार हा कार्यक्रम इयत्ता ६ वी ते १२ मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांचे आई वडील आणि शिक्षक देखील त्यांच्यासाठी विशेष डिझाइन केलेल्या ऑनलाइन उपक्रमांमध्ये भाग घेऊ शकतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पीएम मोदी बोर्ड परीक्षा आणि प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही चिंतेविना यशस्वी कसे व्हावे याबद्दल सल्ला देणार आहेत, असेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
५०० शब्दांत विचारू शकता प्रश्न
परीक्षेवरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी बोर्डाच्या परीक्षेबाबत चर्चा करतील. विद्यार्थी पंतप्रधानांना 500 शब्दांत कोणताही प्रश्न विचारू शकतात आणि पोर्टलवर सबमिट करू शकतात. पंतप्रधान मोदी या प्रश्नांची उत्तरे देतील आणि विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यानचा ताण आणि भीती दूर करण्यासाठी मदत करतील.
सहभागासाठी ‘या’ लिंकवर करा नाव नोंदणी
परिक्षे पे चर्चा-2024 मध्ये सहभागी होण्यासाठी शिक्षण मंत्रालयाकडून शुक्रवार १२ जानेवारी 2024 पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. तुम्हालाही या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल, तर तुम्हाला  https://innovateindia.mygov.in/ppc-2024  या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करावी लागेल. निवड झाल्यानंतर, तुम्हाला पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी मिळेल. यासंदर्भात शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, ही स्पर्धा इयत्ता ६ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना त्यांचा प्रश्न जास्तीत जास्त ५०० अक्षरांमध्ये पंतप्रधानांना पाठवावा लागेल.पालक आणि शिक्षक देखील सहभागी होऊ शकतात, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.
हेही वाचा:

Rahul Gandhi On PM Modi: बेरोजगारी, महागाईमुळे ‘त्या’ तरुणांनी संसदेची सुरक्षा भेदली : राहुल गांधी
India-Oman Partnership | ‘भारत- ओमान’चे द्वीपक्षीय संबंध आणखी मजबूत; जाणून घ्या दोन्ही देशांतील संबंधांविषयी
जोगेश्वरीचा पती भैरवनाथ मालिकेचे १०० भाग पूर्ण, कलाकारांचे अविस्मरणीय क्षण

The post PM मोदींना प्रश्न विचारण्याची सुवर्णसंधी; ‘परीक्षा पे चर्चा-2024’ साठी नाव नोंदणी सुरू appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : pariksha pe charcha 2024 registration पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम सर्वपरिचित आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमामध्ये पीएम मोदींना प्रश्न विचारणे आणि संवाद साधण्यासाठी अर्ज मागविले आहेत. यासाठी शालेय विद्यार्थी उमेदवार शुक्रवार १२ जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील विद्यार्थ्यांना …

The post PM मोदींना प्रश्न विचारण्याची सुवर्णसंधी; ‘परीक्षा पे चर्चा-2024’ साठी नाव नोंदणी सुरू appeared first on पुढारी.

Go to Source