मतदान केंद्रांवरील रांगा होणार कमी; केंद्रांची फेररचना

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात लोकसभेचे पुणे, मावळ, शिरूर आणि बारामती असे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारसंघांसाठी 8 हजार 213 पेक्षा जास्त मतदान केंद्रे असणार आहेत. त्यामुळे मतदान केंद्रांवर मतदानासाठी लागणार्‍या रांगा कमी होण्याची शक्यता आहे. सार्वत्रिक निवडणुकीची तयारी जिल्हा निवडणूक शाखेकडून सुरू झाली आहे. त्यानुसार निवडणुकीसाठीची मतदान केंद्रे निश्चित करण्यात … The post मतदान केंद्रांवरील रांगा होणार कमी; केंद्रांची फेररचना appeared first on पुढारी.

मतदान केंद्रांवरील रांगा होणार कमी; केंद्रांची फेररचना

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात लोकसभेचे पुणे, मावळ, शिरूर आणि बारामती असे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारसंघांसाठी 8 हजार 213 पेक्षा जास्त मतदान केंद्रे असणार आहेत. त्यामुळे मतदान केंद्रांवर मतदानासाठी लागणार्‍या रांगा कमी होण्याची शक्यता आहे. सार्वत्रिक निवडणुकीची तयारी जिल्हा निवडणूक शाखेकडून सुरू झाली आहे. त्यानुसार निवडणुकीसाठीची मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
गेल्या लोकसभेला जिल्ह्यात 8175 मतदान केंद्रे होती, त्यामध्ये यंदा 38 ने वाढ होऊन 8213 मतदान केंद्रे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात निश्चित करण्यात आली होती. मात्र, शहरासह जिल्ह्याची प्रारूप मतदारयादी 27 ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर 9 डिसेंबरपर्यंत मतदार नोंदणी, नाव वगळणी आणि पत्त्यातील दुरुस्ती याबाबतचे तब्बल दोन लाख तीन हजार 119 अर्ज जिल्हा निवडणूक शाखेला प्राप्त झाले आहेत. त्यापैकी एक लाख चार हजार 464 अर्ज हे केवळ मतदार नोंदणीचे आहेत.
या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांत आणखी वाढ होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, अंतिम मतदारयादी 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. या अंतिम यादीत नावे असलेल्या मतदारांनाच लोकसभा निवडणुकीत मतदान करता येणार आहे. सर्व मतदान केंद्रे ही तळमजल्यावर असणार आहेत. तसेच जुन्या इमारती, अपुरी जागा, मतदान केंद्रांकडे जाण्यास प्रशस्त वाट नसणे अशा विविध कारणास्तव 625 इमारतींमधील मतदान केंद्रे किंवा खोल्या बदलण्यात आल्या आहेत. एका मतदान खोलीवर 1500 मतदार मतदान करू शकणार आहेत, त्यापुढील मतदारांना त्याच मतदान केंद्रावर दुसर्‍या खोलीत मतदान करता येणार आहे. त्यामुळे एकाच मतदान खोलीवर मतदारांची गर्दी, रांगा लागणार नाहीत, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सध्याच्या मतदान केंद्रांचा आढावा
जुन्नर 356, आंबेगाव 338, खेड 385, शिरूर 405, दौंड 309, इंदापूर 329, बारामती 376, पुरंदर 410, भोर 561, मावळ 381, चिंचवड 528, पिंपरी 399, भोसरी 464, वडगाव शेरी 452, खडकवासला 465, शिवाजीनगर 280, कोथरूड 398, पर्वती 344, कसबा 270, हडपसर 494 आणि पुणे कॅन्टोन्मेंट 274 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.
हेही वाचा

कांदा उत्पादकांची कोंडी
वृंदा राठी बनल्या पहिल्या भारतीय कसोटी पंच
कोल्हापूर : झाड अंगावर पडल्याने राधानगरी तालुक्यातील एकाचा मृत्यू

The post मतदान केंद्रांवरील रांगा होणार कमी; केंद्रांची फेररचना appeared first on पुढारी.

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात लोकसभेचे पुणे, मावळ, शिरूर आणि बारामती असे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारसंघांसाठी 8 हजार 213 पेक्षा जास्त मतदान केंद्रे असणार आहेत. त्यामुळे मतदान केंद्रांवर मतदानासाठी लागणार्‍या रांगा कमी होण्याची शक्यता आहे. सार्वत्रिक निवडणुकीची तयारी जिल्हा निवडणूक शाखेकडून सुरू झाली आहे. त्यानुसार निवडणुकीसाठीची मतदान केंद्रे निश्चित करण्यात …

The post मतदान केंद्रांवरील रांगा होणार कमी; केंद्रांची फेररचना appeared first on पुढारी.

Go to Source