भारतीय बँकांची वित्तीय तरलता 79.40 टक्क्यांवर!
राजेंद्र जोशी
कोल्हापूर : भारतीय बँकांमध्ये कर्ज वितरणाच्या गतीच्या तुलनेत ठेवींची गती मंदावली आहे. यामुळे पुढील आर्थिक वर्षात (2024-25) वित्तीय तरलता (कर्ज व ठेवींचे गुणोत्तर-सीडी रेशो) 79.49 टक्क्यांवर पोहोचला आहे. साहजिकच, बँकांच्या निव्वळ व्याजाचा परतावा 2.9 टक्क्यांपर्यंत खाली येणे अपेक्षित आहे.
स्टँडर्ड अँड पुअर (एस अँड पी ग्लोबल) या संस्थेने नुकतचा वित्तीय परीक्षणाचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये भारतीय बँकांचा सीडी रेशो वाढल्यामुळे दबावाखाली असल्याचे म्हटले आहे. बँकांच्या ठेवीमध्ये अत्यंत मंदगतीने वाढ होेत आहे. बाजारात कर्जाच्या मागणीबरोबर स्पर्धाही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे बँकांना अतिशय कमी व्याज फरकाने कर्ज वितरण करावे लागत असल्याचे या संस्थेचे निरीक्षण आहे.
कर्जातील वाढ 20.2 टक्क्यांवर जाणार
देशात गेल्या काही वर्षांत कर्जामध्ये होणारी वाढ ही देशाच्या सर्वसाधारण सकल राष्ट्रीय उत्पन्नाशी निगडित केल्यामुळे किरकोळ कर्जांच्या प्रकरणांनी कार्पोरेट कर्जप्रकरणांपुढे आपले पाऊल ठेवले आहे. चालू आर्थिक वर्षात बँकांच्या कर्जांमधील सरासरी वाढ ही 15 टक्के, तर ठेवींमधील वाढ 9.6 टक्क्यांवर आहे. यामुळे सीडी रेशो 75.79 टक्क्यांवर पोहोचला आहे. आगामी आर्थिक वर्षात कर्जांमधील वाढ 20.2 टक्क्यांवर पोहोचेल, तर ठेवींवरील व्याज 13.6 टक्क्यांवर असेल आणि सीडी रेशो 79.49 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज आहे.
The post भारतीय बँकांची वित्तीय तरलता 79.40 टक्क्यांवर! appeared first on पुढारी.
कोल्हापूर : भारतीय बँकांमध्ये कर्ज वितरणाच्या गतीच्या तुलनेत ठेवींची गती मंदावली आहे. यामुळे पुढील आर्थिक वर्षात (2024-25) वित्तीय तरलता (कर्ज व ठेवींचे गुणोत्तर-सीडी रेशो) 79.49 टक्क्यांवर पोहोचला आहे. साहजिकच, बँकांच्या निव्वळ व्याजाचा परतावा 2.9 टक्क्यांपर्यंत खाली येणे अपेक्षित आहे. स्टँडर्ड अँड पुअर (एस अँड पी ग्लोबल) या संस्थेने नुकतचा वित्तीय परीक्षणाचा एक अहवाल प्रसिद्ध केला …
The post भारतीय बँकांची वित्तीय तरलता 79.40 टक्क्यांवर! appeared first on पुढारी.