‘ड्रग्ज – मेड इन खोपोली’ चक्क कंटेनरमधून परदेशात
राजेंद्र पाटील
नवी मुंबई : नाशिकमध्ये ललित पाटीलचा कुप्रसिद्ध एमडी ड्रग्ज कारखाना उघडकीस आल्यानंतर पुणे, रायगड, सोलापूर या जिल्ह्यांतही एकापाठोपाठ एक अशा ड्रग्ज कारखान्यांचा पर्दाफाश झाला. मात्र आता उघडकीस आलेल्या खोपोलीच्या ड्रग्ज कारखान्याने आंतरराष्ट्रीय झेप घेत वेेगवेगळ्या बंदरांतून आपले ड्रग्ज कंटेनरमधून ‘निर्यात’ केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
खोपोलीतील तपासातून हाती आलेल्या माहितीनुसार, मेड इन खोपोली एमडी ड्रग्ज निर्यात प्रकरणी कंटेनर मालक, निर्यातदार, क्लिअरिंग एजंटस्, केमिकल पुरवठादार यांचीही चौकशी केली जाणार आहे. या ड्रग्ज निर्यातीचे धागेदोरे बाहेरील राज्यांमध्येही पसरल्याचा संशय आहे.
राज्यात विशेषत: मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत नायजेरियन नागरिकांकडून ड्रग्जची विक्री केल्याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल केले. नायजेरियन नागरिकांना अटकही केली. या नागरिकांना वास्तव्यास मदत करणार्या घरमालकांवर गुन्हे दाखल केले. मात्र प्रत्यक्षात राज्यातच ड्रग्जचे कारखाने उभे राहिल्याचे नाशिक ललित पाटील प्रकरणानंतर समोर आले आणि पोलिस दलाची अक्षरश: झोप उडाली.
यापूर्वी जेएनपीटी बंदराच्या बाहेर लॉजेस्टिक पार्कमध्ये एक वर्षापासून उभा केलेल्या कंटेनरमधून दिल्ली पोलिसांनी 3 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त केले होते; तर वाशी हायवेवर फळे आणि भाज्या घेऊन जाण्याचे सोंग करणार्या वाहनांवर कारवाई करत डीआरआयने कोट्यवधीचे
ड्रग्ज जप्त केले आणि वाहनचालक, ड्रग्ज पेडलर गजाआड केले होते. अनेक बंदरात परदेशातून आलेल्या कंटेनरची तपासणी करत डीआरआयने कोट्यवधीचे ड्रग्ज पडकले. एकीकडे ड्रग्जची आंतरराष्ट्रीय तस्करी पकडली जात असताना महाराष्ट्रात आणि आता त्यातही खोपोलीमध्ये तयार होत असलेले ड्रग्ज विविध बंदरांतून विदेशात जात असताना या यंत्रणांच्या कानालाही खबर लागली नाही. छुप्या पद्धतीने हे ड्रग्ज कारखाने सुरू राहिले, राज्यात आणि राज्याबाहेर आणि ओघानेच विदेशात ड्रग्ज पाठवत राहिले, असे दिसते.
नाशिकच्या ललित पाटीलच्या कारखान्यानंतर राज्यातील ड्रग्ज बनविनार्या कारखान्यांची शोध सुरू झाला. पाच ते सहा महिन्यांत ड्रग्ज बनविनार्या कारखान्यांवर कारवाई करत मुंबई, नाशिक, पुणे, रायगड, नवी मुंबई पोलिसांनी चार महिन्यांत 747 कोटींचे ड्रग्ज एमडी पावडरचा साठा जप्त केला. तर कोट्यवधी रुपयांचा कच्चा माल जप्त करत कारखान्यांना सील ठोकले. आता या कारवाईतून अनेक महत्त्वाचे धागेदोरे समोर येऊ लागले आहेत.
नवी मुंबई पोलिसांनी खोपोलीत पहिली कारवाई करत 6 कोटींचे ड्रग्ज जप्त केले आणि मग रायगड पोलिसांनी याच रायगड जिल्ह्यातील खोपोलीतून 325 कोटींचे ड्रग्ज (एमडी पावडर) जप्त केली. अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून ड्रग्ज निर्यात उघड झाली.
The post ‘ड्रग्ज – मेड इन खोपोली’ चक्क कंटेनरमधून परदेशात appeared first on पुढारी.
नवी मुंबई : नाशिकमध्ये ललित पाटीलचा कुप्रसिद्ध एमडी ड्रग्ज कारखाना उघडकीस आल्यानंतर पुणे, रायगड, सोलापूर या जिल्ह्यांतही एकापाठोपाठ एक अशा ड्रग्ज कारखान्यांचा पर्दाफाश झाला. मात्र आता उघडकीस आलेल्या खोपोलीच्या ड्रग्ज कारखान्याने आंतरराष्ट्रीय झेप घेत वेेगवेगळ्या बंदरांतून आपले ड्रग्ज कंटेनरमधून ‘निर्यात’ केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. खोपोलीतील तपासातून हाती आलेल्या माहितीनुसार, मेड इन खोपोली एमडी ड्रग्ज निर्यात …
The post ‘ड्रग्ज – मेड इन खोपोली’ चक्क कंटेनरमधून परदेशात appeared first on पुढारी.