माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला : अजित पवार
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : पीएचडी संदर्भातील माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असून मी यापूर्वीच दिलगिरी व्यक्त केली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
दरम्यान यावेळी त्यांना जुन्या पेन्शनबाबत प्रश्न विचारले असता ते म्हणाले, शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. ही वस्तुस्थिती असली तरी जुनी पेन्शनबाबत कालच्या बैठकीत संघटनांना संपूर्ण माहिती दिली आहे. यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी निर्णय घेतला जाईल. जुन्या पेन्शन योजनेबाबत काल बैठक झाली आहे. यामध्ये मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. तसेच कांदा, इथेनॉल दूधदर प्रश्न चर्चेसाठी केंद्रीय गृहमंत्री, सहकारमंत्री अमित शहा यांची वेळ मागितल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, ओबीसी संघटना बैठकीत ठरल्यानुसार सारथी, बार्टी व महाज्योती योजनेसाठी पैसे दिले जातील, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :
धनगर आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ व्हावी : आमदार पडळकर यांची उपोषण समितीच्या बैठकीनंतर प्रतिक्रिया
Winter Session 2023 : संसदेनंतर महाराष्ट्र विधानसभेतही गोंधळ, पत्रकाराची सरकारविरोधात घोषणाबाजी
जत पूर्व भागाला तुबची बबलेश्वरमधून पाणी द्यावे : आमदार सावंत यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
The post माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला : अजित पवार appeared first on पुढारी.
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : पीएचडी संदर्भातील माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असून मी यापूर्वीच दिलगिरी व्यक्त केली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान यावेळी त्यांना जुन्या पेन्शनबाबत प्रश्न विचारले असता ते म्हणाले, शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. ही वस्तुस्थिती असली तरी जुनी पेन्शनबाबत कालच्या बैठकीत संघटनांना संपूर्ण माहिती दिली आहे. …
The post माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला : अजित पवार appeared first on पुढारी.