Toranagad : तोरणागडाच्या शिवकालीन मार्गाची दुरवस्था

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  तोरणागडावर जाणार्‍या वेल्हे बुद्रुक ते तोरणागड या शिवकालीन पायी मार्गाची दुरवस्था झाली आहे. दुरुस्तीकडे वनविभागाने दुर्लक्ष केले आहे. या मार्गाने पर्यटकांना डोंगरकड्यावरून चढ -उतार करताना मोठी कसरत करावी लागत आहे. पाय घसरुन पर्यटक जखमी होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे या मार्गाची डागडुजी करण्याची मागणी स्थानिक मावळा जवान संघटनेने केली … The post Toranagad : तोरणागडाच्या शिवकालीन मार्गाची दुरवस्था appeared first on पुढारी.

Toranagad : तोरणागडाच्या शिवकालीन मार्गाची दुरवस्था

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  तोरणागडावर जाणार्‍या वेल्हे बुद्रुक ते तोरणागड या शिवकालीन पायी मार्गाची दुरवस्था झाली आहे. दुरुस्तीकडे वनविभागाने दुर्लक्ष केले आहे. या मार्गाने पर्यटकांना डोंगरकड्यावरून चढ -उतार करताना मोठी कसरत करावी लागत आहे. पाय घसरुन पर्यटक जखमी होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे या मार्गाची डागडुजी करण्याची मागणी स्थानिक मावळा जवान संघटनेने केली आहे. याबाबत वेल्हे तालुका वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लगुंटे यांना निवेदन देण्यात आले आहे. गडाच्या पायथ्यापर्यंत वाहने जात असल्याने पर्यटक व दुर्गप्रमी पाय वाटेने गडावर जात असतात. एकीकडे पर्यटकांची संख्या वाढली आहे, तर दुसरीकडे दुर्घटना वाढल्या आहेत. जवळपास दोन किलोमीटरचा हा पायी मार्ग वनविभागाच्या क्षेत्रात आहेत. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी मार्गावर धोकादायक ठिकाणी लोखंडी संरक्षक कठडे व आवश्यक ठिकाणी दगडी पायर्‍या बसवण्यात याव्यात, अशी मागणी संघटनेचे वेल्हे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर वेगरे, कार्याध्यक्ष रामभाऊ राजीवडे, अशोक सावंत, बापुसाहेब साबळे आदींनी केली आहे.
मार्ग झाला निसरडा
शिवकाळातील पायी मार्गाच्या दगडी पायर्‍या अनेक ठिकाणी निखळून पडल्या आहेत. अरुंद तसेच धोकादायक ठिकाणी मुरुम, मातीही वाहून गेली आहे. त्यामुळे हा मार्ग निसरडा झाला आहे.
हेही वाचा :

Pune News : अस्वच्छ शौचालये; मुलांना संसर्गांचा धोका
Pune News : विद्यापीठाकडून पुढील वर्षापासून डिप्लोमा कोर्स बंद

The post Toranagad : तोरणागडाच्या शिवकालीन मार्गाची दुरवस्था appeared first on पुढारी.

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  तोरणागडावर जाणार्‍या वेल्हे बुद्रुक ते तोरणागड या शिवकालीन पायी मार्गाची दुरवस्था झाली आहे. दुरुस्तीकडे वनविभागाने दुर्लक्ष केले आहे. या मार्गाने पर्यटकांना डोंगरकड्यावरून चढ -उतार करताना मोठी कसरत करावी लागत आहे. पाय घसरुन पर्यटक जखमी होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे या मार्गाची डागडुजी करण्याची मागणी स्थानिक मावळा जवान संघटनेने केली …

The post Toranagad : तोरणागडाच्या शिवकालीन मार्गाची दुरवस्था appeared first on पुढारी.

Go to Source