संसद घुसखोरी प्रकरणावरून गदारोळ; एकूण १५ खासदारांचे निलंबन

पुढारी ऑनलाईन डेस्क: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज ९ वा दिवस आहे. दरम्यान काल संसदेत दोन तरूणांनी घुसखोरी केली. दरम्यान संसद आणि परिसरात या तरूणांनी धुरांच्या नळकांड्या देखील फोडल्या. या घटनेचे पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले. यावरून विरोधकांनी लोकसभा आणि राज्यसभेत घोषणाबाजी करत गदारोळ घातला. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहातील काँग्रेसचे ९, डीएमकेचे २, सीपीआय आणि … The post संसद घुसखोरी प्रकरणावरून गदारोळ; एकूण १५ खासदारांचे निलंबन appeared first on पुढारी.

संसद घुसखोरी प्रकरणावरून गदारोळ; एकूण १५ खासदारांचे निलंबन

पुढारी ऑनलाईन डेस्क: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज ९ वा दिवस आहे. दरम्यान काल संसदेत दोन तरूणांनी घुसखोरी केली. दरम्यान संसद आणि परिसरात या तरूणांनी धुरांच्या नळकांड्या देखील फोडल्या. या घटनेचे पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले. यावरून विरोधकांनी लोकसभा आणि राज्यसभेत घोषणाबाजी करत गदारोळ घातला. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहातील काँग्रेसचे ९, डीएमकेचे २, सीपीआय आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रत्येकी एका खासदाराचे निलंबन करण्यात आले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील उर्वरित सत्रासाठी हे खासदार निलंबित असणार आहेत, असे वृत्त ‘इंडिया टुडे’ ने दिले आहे. ( Suspended MPs)

A total of 15 MPs suspended from the Parliament today for the remainder of the winter session – 14 from Lok Sabha and one from Rajya Sabha.
(File pic) pic.twitter.com/q3ZXo8RDtb
— ANI (@ANI) December 14, 2023

Suspended MPs: “अनियमित वर्तन” केल्याबद्दल खासदारांविरोधी कारवाईचा बडगा
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला ४ डिसेंबपासून सुरूवात झाली आहे. दरम्यान २३ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. दरम्यान अधिवेशनाच्या ८ व्या दिवशी बुधवारी (दि.१३) संसदेच्या लोकसभा सभागृहाचे सत्र सुरू असतानाच दोन तरूणांनी संसदेत घुसखोरी करत, धुराच्या नळकांड्या फोडल्या. तर काही तरूणांनी ‘तानाशाही नहीं चलेगी, लोकतंत्र बचाओ, काला कानून खतम करो,’ अशा घोषणा देत संसदेबाहेर देखील धुराच्या नळकांड्या फोडल्या. दरम्यान दिल्ली पोलिसांनी तत्काळ आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर संसदेची सुरक्षा देखील वाढवण्यात आली. त्यानंतर आज (दि.१४) संसदेचे कामकाज सुरू होताच, विरोधकांनी गदारोळ घातला. याची गंभीर दखल घेत, विरोधी पक्षातील खासदारांनी “अनियमित वर्तन” केल्याबद्दल कारवाईचा बडगा उगारण्यात आला. दरम्यान एकूण १५ खासदारांना (१४ लोकसभा, १-राज्यसभा) निलंबित करण्यात आले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशन कालावधीपर्यंत (२३ डिसेंबरपर्यंत) निलंबित करण्यात आले आहे. ( Suspended MPs)
विरोधी पक्षातील काँग्रेससह या पक्षातील खासदारांचे निलंबन
संसद घुसखोरी प्रकरणाचे आज (दि.१४) अधिवेशनाच्या ९ व्या दिवशी तीव्र पडसाद उमटले. संसदेच्या दोन्ही सभागृहात या घटनेवरून गदारोळ झाला. दरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहात “अनियमित वर्तन” केल्याबद्दल एक राज्यसभा आणि इतर १४ लोकसभेच्या खासदारांना निलंबित करण्यात आले. यामध्ये लोकसभेतील विरोधी पक्षातील काँग्रेस ९, डीएमकेचे २ तर सीपीआय आणि राज्यभेतील तृणमूल काँग्रेसच्या प्रत्येकी एका खासदाराचे निलंबन करण्यातआले आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी संबंधित खासदारांना निलंबित करण्याचा ठराव मांडला. त्यानंतर लोकसभेत हा ठराव मंजूर देखील झाला, असे वृत्त ‘इंडिया टुडे’ ने दिले आहे. ( Suspended MPs)
हेही वाचा  :

PM Modi On Parliament Security Breach: ‘संसद घुसखोरी’ प्रकरणी PM मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक
security breach in parliament: संसदेतील सुरक्षा व्यवस्थेवरून राज्‍यसभेत गदारोळ, ‘तृणमूल’ खासदार ओब्रायन निलंबित
Parliament Winter Session: संसद ‘घुसखोरी’ प्रकरणी लोकसभेत गदारोळ; कामकाज दुपारी २ पर्यंत तहकूब

The post संसद घुसखोरी प्रकरणावरून गदारोळ; एकूण १५ खासदारांचे निलंबन appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज ९ वा दिवस आहे. दरम्यान काल संसदेत दोन तरूणांनी घुसखोरी केली. दरम्यान संसद आणि परिसरात या तरूणांनी धुरांच्या नळकांड्या देखील फोडल्या. या घटनेचे पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले. यावरून विरोधकांनी लोकसभा आणि राज्यसभेत घोषणाबाजी करत गदारोळ घातला. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहातील काँग्रेसचे ९, डीएमकेचे २, सीपीआय आणि …

The post संसद घुसखोरी प्रकरणावरून गदारोळ; एकूण १५ खासदारांचे निलंबन appeared first on पुढारी.

Go to Source