पारंपरिक पाटा, वरवंटा, उखळ, जाते लुप्त होण्याच्या मार्गावर
पेठ : पुढारी वृत्तसेवा : काळाच्या ओघात दळण, वाटण बनविण्यासाठी इलेक्ट्रीक साधने बाजारात आली. त्यामुळे बहुतांश घरातील पारंपरिक दगडी पाटा, वरवंटा, जाते, उखळ आदी वस्तू अडगळीत पडल्या. परिणामी या वस्तू तयार करण्याचा व्यवसायदेखील बंद होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, काही ठरावीक कारागीरांनी अद्यापही हा व्यवसाय टिकवून ठेवला आहे. यापूर्वीच्या काळात स्वयंपाकावेळी घरोघरी कांदा, लसूण आणि इतर मसाल्यांचे वाटण लागे. ते वाटण बनविण्यासाठी दगडी पाटा आणि वरवंटा असायचा. पाटा व वरवंट्याने वाटून बनवलेल्या वाटणामुळे जेवणाला एक वेगळीच चव असायची. तसेच पीठ दळण्यासाठी दगडी जाते व चटणी, मसाले बनविण्यासाठी उखळाचा उपयोग होत असे. मात्र, काळाच्या ओघामध्ये पाटा, वरवंटा, जाते, उखळ आजी वस्तू मागे पडल्या आणि घरोघरी मिक्सर, फि—ज, पिठाची चक्की आदी साधने आली.
त्यामुळे पाटा, वरवंटा, उखळ, जाते बनविण्याचा व्यवसायदेखील लोप पावत चालला आहे. मात्र अजूनही काही कारागीरांनी हा व्यवसाय टिकवून ठेवला आहे. ग्रामीण भागातील काही घरांत पाटा, वरवंटा, उखळ, जाते वापरात आहे. अजूनही मुला-मुलींची लग्न असताना हळद दळण्यासाठी दगडी जात्याचाच वापर केला जात आहे. दगडी जाते आकर्षक पद्धतीने सजवून त्याच्यावरील फोटो अनेकजण हौसेने सोशल मीडियावर व्हायरल करत असतात. तर घरात सजावटीसाठीदेखील या वस्तूंचे जतन केले जात आहे.
पेठ (ता. आंबेगाव) येथे जाते, पाटा, वरवंटा, उखळ बनविणारे कारागीर रवी धोंडीराम सुरे हे आले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची ही तिसरी पिढी या व्यवसायामध्ये आहे. चाळीसगाव येथून अनगड दगडाची खरेदी करून त्यावर घडीव काम केले जाते आणि मग त्याची विक्री केली जाते. पण आता पहिल्यासारखे गिर्हाईक भेटत नाही. भांडवल भरपूर अडकले जाते. चाळीसगाववरून ट्रकला साधारणपणे पेठपर्यंत 15 हजार रुपये भाडे द्यावे लागत आहे. एका ट्रकमध्ये साधारणपणे 200 जाते, पाट्याचा, उखळाचा दगड आणला जातो आणि त्यावर काम करून विक्री केली जाते. पूर्वीसारखे जात्यांना टाके लावायला गिर्हाईकदेखील येत नाही, अशी खंत सुरे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा :
Jalgaon Crime : पती बाहेरगावी- पत्नी माहेरी, इकडे चोरट्यांनी साधला डाव; ३ लाखांची घऱफोडी
दुष्काळामुळे ज्वारीचे 60 हजार हेक्टर क्षेत्र राहणार नापेर
The post पारंपरिक पाटा, वरवंटा, उखळ, जाते लुप्त होण्याच्या मार्गावर appeared first on पुढारी.
पेठ : पुढारी वृत्तसेवा : काळाच्या ओघात दळण, वाटण बनविण्यासाठी इलेक्ट्रीक साधने बाजारात आली. त्यामुळे बहुतांश घरातील पारंपरिक दगडी पाटा, वरवंटा, जाते, उखळ आदी वस्तू अडगळीत पडल्या. परिणामी या वस्तू तयार करण्याचा व्यवसायदेखील बंद होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, काही ठरावीक कारागीरांनी अद्यापही हा व्यवसाय टिकवून ठेवला आहे. यापूर्वीच्या काळात स्वयंपाकावेळी घरोघरी कांदा, लसूण आणि इतर …
The post पारंपरिक पाटा, वरवंटा, उखळ, जाते लुप्त होण्याच्या मार्गावर appeared first on पुढारी.