कोल्हापूर : धनगरमोळा येथे साडेतीन एकरातील ऊस जळून खाक

आजरा : पुढारी वृत्तसेवा : धनगरमोळा (ता. आजरा) येथे लागलेल्या आगीत साडेतीन एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाला. अंकुश विठ्ठल पाटील या शेतकऱ्याचे सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की , धनगरमोळा व सुळेरान परिसरालगत नलवडे फार्म जवळ माजी सैनिक शेटगे यांचे शेत आहे. दुपारी साडे बाराच्या सुमाराला आग लागली. … The post कोल्हापूर : धनगरमोळा येथे साडेतीन एकरातील ऊस जळून खाक appeared first on पुढारी.
#image_title

कोल्हापूर : धनगरमोळा येथे साडेतीन एकरातील ऊस जळून खाक

आजरा : पुढारी वृत्तसेवा : धनगरमोळा (ता. आजरा) येथे लागलेल्या आगीत साडेतीन एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाला. अंकुश विठ्ठल पाटील या शेतकऱ्याचे सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , धनगरमोळा व सुळेरान परिसरालगत नलवडे फार्म जवळ माजी सैनिक शेटगे यांचे शेत आहे. दुपारी साडे बाराच्या सुमाराला आग लागली. प्रसंगावधान साधून आग विझवल्यामुळे पुढील अनर्थ टळला. शार्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या शेतातील साडेतीन एकर क्षेत्रावर त्यांनी ऊसाची लागवड केली होती. या शेता लगत विद्युतवाहिनी गेली आहे. उसाला आग लागल्याचे रस्त्यावरून जाणाऱ्या जयसिंग पाटील यांना दिसले. त्यांनी माऊली शाळेतील शिक्षक व विद्यार्थांना माहिती दिली. विद्यार्थी व शिक्षकांनी पाणी व झाडांचे डहाळे वापरून आग विझवली.
प्रसंगावधान राखून आग विझवल्यामुळे सुमारे दहा ते पंधरा एकरवरील ऊस वाचला. अंकुश पाटील हे विनाअनुदानित शाळेत शिक्षक म्हणून काम करीत आहेत. ऊस जळाल्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आजरा कारखान्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
हेही वाचा 

कोल्हापूर : कबनूरमध्ये पंधरा एकरातील ऊस जळून खाक, ३० लाखाहून अधिक नुकसान
कोल्हापूर : सरूड येथील प्रथमेश केसरेची क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड
कोल्हापूर : दामदुपटीच्या आमिषाने कोटीचा गंडा; जीएसटी अधिकार्‍यासह 5 जणांना अटक

The post कोल्हापूर : धनगरमोळा येथे साडेतीन एकरातील ऊस जळून खाक appeared first on पुढारी.

आजरा : पुढारी वृत्तसेवा : धनगरमोळा (ता. आजरा) येथे लागलेल्या आगीत साडेतीन एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाला. अंकुश विठ्ठल पाटील या शेतकऱ्याचे सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की , धनगरमोळा व सुळेरान परिसरालगत नलवडे फार्म जवळ माजी सैनिक शेटगे यांचे शेत आहे. दुपारी साडे बाराच्या सुमाराला आग लागली. …

The post कोल्हापूर : धनगरमोळा येथे साडेतीन एकरातील ऊस जळून खाक appeared first on पुढारी.

Go to Source