सिंधुदुर्ग : माड्याचीवाडी येथे गवारेड्याची मोटरसायकलला धडक, दोघे जखमी
कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : कुडाळ पाट मार्गावर माड्याचीवाडी विद्यालयानजीक गवारेडा अचानक आडवा आल्याने एका मोटरसायकल वरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यातील जखमींना कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून ही बुधवारी सायंकाळी ७ वा च्या सुमारास घडली.
प्रथमेश लक्ष्मण पवार (२८ रा.पाट) हे विकास तावडे हे कुडाळ येथून पाट येथे आपल्या मोटरसायकलने जात होते. यावेळी माड्याचीवाडी विद्यालयानजीक एक गवारेडा अचानक आडवा आला. रस्ता ओलांडताना गवारेड्याने अचानक मोटरसायकल समोरच उडी घेतली. यावेळी या मोटरसायकल स्वाराची या गवारेड्याला जोरदार धडक बसली. यावेळी मोटरसायकल वरील दोघेही गाडीवरून खाली पडले. यानंतर जखमीवस्थेतील दोघांना कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.यातील प्रथमेश पवार यांच्या डोक्याला दुखापत झाली असून तावडे यांच्या एका हाताला दुखापत झाली असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.या भागात गवारेड्यांचे कायम वास्तव्य असते. येथील विद्यालयाच्या मैदानावरही सकाळच्या वेळेत गवारेडे मुलांना दृष्टीस पडतात अशी माहिती स्थानिकांनी दिली. दरम्यान शालेय मैदान परिसरातील गवारेड्यांचा एक व्हिडिओ ही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे या भागातील गवारेड्यांपासून मुलांच्याही जीवितास धोका निर्माण झाला. याची वनविभागाने तत्परतेने दखल घेऊन याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी स्थानिकांमधून करण्यात येत आहे.
The post सिंधुदुर्ग : माड्याचीवाडी येथे गवारेड्याची मोटरसायकलला धडक, दोघे जखमी appeared first on पुढारी.
कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : कुडाळ पाट मार्गावर माड्याचीवाडी विद्यालयानजीक गवारेडा अचानक आडवा आल्याने एका मोटरसायकल वरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यातील जखमींना कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून ही बुधवारी सायंकाळी ७ वा च्या सुमारास घडली. प्रथमेश लक्ष्मण पवार (२८ रा.पाट) हे विकास तावडे हे कुडाळ येथून पाट येथे आपल्या मोटरसायकलने जात …
The post सिंधुदुर्ग : माड्याचीवाडी येथे गवारेड्याची मोटरसायकलला धडक, दोघे जखमी appeared first on पुढारी.