ठाणे : ठाकरे गटाकडून मंत्री दीपक केसरकारांचा पुतळा जाळून निषेध

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अपात्रता सुनावणीच्या दरम्यान दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दीपक केसरकर यांचा पुतळा जाळून त्यांचा तीव्र शब्दांत आज (दि.१३) निषेध नोंदवला. केसरकारांच्या अशाप्रकारच्या विधानानंतर ठाण्यात त्यांच्याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. Deepak Kesarkar शिवसेना आमदार … The post ठाणे : ठाकरे गटाकडून मंत्री दीपक केसरकारांचा पुतळा जाळून निषेध appeared first on पुढारी.
#image_title

ठाणे : ठाकरे गटाकडून मंत्री दीपक केसरकारांचा पुतळा जाळून निषेध

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अपात्रता सुनावणीच्या दरम्यान दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दीपक केसरकर यांचा पुतळा जाळून त्यांचा तीव्र शब्दांत आज (दि.१३) निषेध नोंदवला. केसरकारांच्या अशाप्रकारच्या विधानानंतर ठाण्यात त्यांच्याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. Deepak Kesarkar
शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीने आता वेग धरला आहे. या प्रकरणी होत असलेल्या उलट तपासणीतून अनेक धक्कादायक माहिती समोर येताना दिसत आहे. आता तर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उलट तपासणीत बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी धाडसी विधान केले आहे. विधानसभा अध्यक्षांच्या सूचनेनुसार दोन्ही गटांचे वकील साक्षीदारांची उलट तपासणी करत आहेत. पहिल्या सत्रात शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांच्यानंतर शिक्षणमंत्री दीपक केसरकरांची उलट तपासणी झाली. यावेळी केसरकरांनी बाळासाहेब लोकशाही मानत नव्हते, असे गंभीर वक्तव्य केले आहे. केसरकरांच्या या वक्तव्यामुळे शिंदे आणि ठाकरे गटातील वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Deepak Kesarkar
दीपक केसरकारांच्या या विधानानंतर ठाकरे गटाचे पदाधिकारी तुषार रसाळ आणि इतर पदाधिकाऱ्यांनी नौपाडा परिसरातील बी केबिन परिसरात दीपक केसरकर यांचा पुतळा जाळला. यावेळी केसरकारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.
Deepak Kesarkar दीपक केसरकर काय म्हणाले ?
ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामतांनी उलट तपासणीत मंत्री केसरकरांची चांगलीच कोंडी केली होती. यावेळी त्यांनी केसरकरांना अनेक प्रश्न विचारले. याला उत्तर देताना केसरकरांनी बाळासाहेब ठाकरे लोकशाही मानत नसल्याचे सांगितले. ‘बाळासाहेबांनी लोकशाहीची कुठलीही तत्वे पाळलेली नाहीत. ते मनमानीपणे पक्ष चालवत होते. त्यांनी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कुठल्याही निवडणुका घेतलेल्या नाहीत,’ अशा आशयाची विधाने केल्याची माहिती अनिल परब यांनी सोशल मीडियावर दिली आहे.
हेही वाचा 

ठाणे: कल्याण येथून विद्यार्थ्याचे अपहरण करणारे दोघे जेरबंद
ठाणे : कसारा रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी रुळावरुन घसरली; नाशिकसह मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत
ठाणे : कल्याणच्या कार्यशाळेत भीषण आगीत केडीएमटीच्या दोन बस जळून खाक

The post ठाणे : ठाकरे गटाकडून मंत्री दीपक केसरकारांचा पुतळा जाळून निषेध appeared first on पुढारी.

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अपात्रता सुनावणीच्या दरम्यान दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दीपक केसरकर यांचा पुतळा जाळून त्यांचा तीव्र शब्दांत आज (दि.१३) निषेध नोंदवला. केसरकारांच्या अशाप्रकारच्या विधानानंतर ठाण्यात त्यांच्याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. Deepak Kesarkar शिवसेना आमदार …

The post ठाणे : ठाकरे गटाकडून मंत्री दीपक केसरकारांचा पुतळा जाळून निषेध appeared first on पुढारी.

Go to Source