अमरावती : महानुभाव पंथातील ‘साहित्य शिरोमणी’ कारंजेकरबाबा यांचे निधन
अमरावती; पुढारी वृत्तसेवा : वयाची ९२ वी पार केल्यानंतरही व्रतस्थपणे लेखन, वाचन करणारे महानुभाव पंथाचे ज्येष्ठ साहित्यिक व संत प्रा. पुरुषोत्तम नागपूरे उपाख्य कारंजेकर दादा यांचे मंगळवारी (दि. १२) अमरावती येथे निधन झाले.
प्रा.पुरुषोत्तम नागपुरे यांच्या निधनाने एका संवेदनशील लेखकाला महानुभाव व मराठी साहित्य विश्व मुकले आहे. वर्धा जिल्ह्यातील खडकी येथील स्वातंत्र्य संग्राम सेनानी चंद्रभानजी नागपुरे यांचे पुत्र म्हणून जन्माला आलेले पुरुषोत्तम नागपुरे हे महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागात ३५ वर्ष सेवा करत एमईएस वर्ग १ या पदावरुन पुणे येथून १९९१ ला सेवानिवृत्त झाले. विविध साहित्य संशोधन व ग्रंथाचे लेखन त्यांनी केले असुन जवळपास ३२ ग्रंथ त्यांनी लिहीले.
त्यात प्रामुख्याने लीळाचरित्र ग्रंथाचा समावेश आहे. स्वातंत्र्यसंग्राम सेवा अभिषेक, महानुभावांचे वैदिकत्व, वाद-प्रवाद, संशोधनात्मक वैचारिक लेख, महानुभाव : एक आवाहन,प्राचीन मराठी काव्य ग्रंथ ज्ञान प्रबोध, श्री चक्रधरांची सुबोध जीवनगाथा जय श्री चक्रधरा, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त कथा सुर्य उगवला, श्री चक्रधरांच्या भ्रमणांची भौगोलिक माहिती, तिर्थप्रसाद, महाराष्ट्र शासन संपादीत ग्रंथ चक्रधर दर्शन, चरित्र संशोधन लीळा चरित्र , कादंबरी पंढरीस संदेश, एैतिहासीक कादंबरी दरना अशा विविध ग्रंथ, कादंबरी व पुस्तकाची निर्मितीसह आपल्या लेखनीतून त्यांनी विपूल साहित्य संपदा निर्माण केली. श्री क्षेत्र रिध्दपूर येथे श्री प्रभु प्रबोधन संस्था स्थापन केली. महानुभाव या मासीक पत्रिकेचे तथा ओज या साप्ताहिकाचे संपादनही तेच करत. नागपुर विद्यापीठाचे १२ वर्ष सिनेट सदस्य, तर अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठात महानुभाव साहित्य संशोधन केंद्र स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता. अखिल भारतीय महानुभाव साहित्य सेवा मंडळाच्या वतीने देशातील विविध भागात ११ साहित्य संमेलनांचे आयोजन त्यांच्या मार्गदर्शनात यशस्वीरित्या करण्यात आले होते. साहित्य क्षेत्रातील कार्याकरीता त्यांना जीवन गौरव पुरस्कार, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे सम्मान पत्र, संशोधन साहित्य रत्न पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, अशा विविध पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता.
The post अमरावती : महानुभाव पंथातील ‘साहित्य शिरोमणी’ कारंजेकरबाबा यांचे निधन appeared first on पुढारी.
अमरावती; पुढारी वृत्तसेवा : वयाची ९२ वी पार केल्यानंतरही व्रतस्थपणे लेखन, वाचन करणारे महानुभाव पंथाचे ज्येष्ठ साहित्यिक व संत प्रा. पुरुषोत्तम नागपूरे उपाख्य कारंजेकर दादा यांचे मंगळवारी (दि. १२) अमरावती येथे निधन झाले. प्रा.पुरुषोत्तम नागपुरे यांच्या निधनाने एका संवेदनशील लेखकाला महानुभाव व मराठी साहित्य विश्व मुकले आहे. वर्धा जिल्ह्यातील खडकी येथील स्वातंत्र्य संग्राम सेनानी चंद्रभानजी …
The post अमरावती : महानुभाव पंथातील ‘साहित्य शिरोमणी’ कारंजेकरबाबा यांचे निधन appeared first on पुढारी.