नीरव मोदीची एमआयडीसीमधील जागा घेण्यासाठी रोहित पवारांचा आटापिटा : राम शिंदे यांचे आरोप
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : कर्जत जामखेड एमआयडीसीतील जागा घेण्यासाठी आमदार रोहित पवारांचा हा आटापिटा सुरु असल्याचा आरोप आमदार राम शिंदे यांनी आज श्रदि. १३) केला..
रोहित पवार नीरव मोदीसाठी लढतायत मी कर्जत जामखेडच्या युवकांसांठी लढतोय. मी दिलेल्या कागदपत्राच्या आधारे उद्योग विभागासाठी नीरव मोदीची जमीन एमआयडीसीसाठी घेता येणार नाही, असे उद्योग मंत्र्यांनी जाहीर केले.
१५ दिवसांत एमआयडीसीसाठीचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे आमदार उदय सामंतांनी निर्देश दिले आहेत, अशी माहिती भाजप आमदार राम शिंदे यांनी दिली. संघर्ष यात्रेवर करताना ते म्हणाले की, स्वतःवर फुलांचा वर्षांव करून घेणे, तलावात उड्या मारणे, असा संघर्ष नसतो.रोहित पवार यांनी त्यांच्या जीवनात कधीच संघर्ष पाहिलेला नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीचं ते वक्तव्य करतात. राजकारणामध्ये आता आमदार झालोय मंत्री झालो तर माझा नातू नक्की कारखानेच कारखाने काढेल असे प्रत्युत्तर राम शिंदे यांनी दिले.
The post नीरव मोदीची एमआयडीसीमधील जागा घेण्यासाठी रोहित पवारांचा आटापिटा : राम शिंदे यांचे आरोप appeared first on पुढारी.
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : कर्जत जामखेड एमआयडीसीतील जागा घेण्यासाठी आमदार रोहित पवारांचा हा आटापिटा सुरु असल्याचा आरोप आमदार राम शिंदे यांनी आज श्रदि. १३) केला.. रोहित पवार नीरव मोदीसाठी लढतायत मी कर्जत जामखेडच्या युवकांसांठी लढतोय. मी दिलेल्या कागदपत्राच्या आधारे उद्योग विभागासाठी नीरव मोदीची जमीन एमआयडीसीसाठी घेता येणार नाही, असे उद्योग मंत्र्यांनी जाहीर केले. १५ दिवसांत …
The post नीरव मोदीची एमआयडीसीमधील जागा घेण्यासाठी रोहित पवारांचा आटापिटा : राम शिंदे यांचे आरोप appeared first on पुढारी.