पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅन इंडियाचा सुपरस्टार प्रभास स्टारर यावर्षीचा बहुप्रतीक्षित चित्रपट सालार : पार्ट १ सीझफायर रिलीजच्या दिशेने वाटचाल करत आहे. (Salaar Movie) नुकत्याच रिलीज झालेल्या ट्रेलरने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. आता पृथ्वीराज सुकुमारन यांनी तेलुगू, कन्नड, तमिळ, हिंदी आणि मल्याळम या पाचही भाषांमध्ये चित्रपटाचे डबिंग पूर्ण केल्याचे अपडेट समोर आली आहे. (Salaar Movie)
संबंधित बातम्या –
Salaar First Song : प्रभासच्या ‘सालार’मधील ‘सूरज ही छाव बनाके’ पहिलं गाणं रिलीज
हॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट ‘मनी प्लेन’ येतोय मराठीमध्ये
Tripti Dimri : इंटिमेंट सीन गाजताच तृप्ती ‘या’ अभिनेत्यासोबत करणार रोमान्स?
“#Salaar चे अंतिम डबिंग दुरुस्त करण्यात आले आहे. मला गेल्या अनेक वर्षांमध्ये माझ्या सर्व पात्रांना माझा आवाज देण्याचा बहुमान मिळाला आहे. मी माझ्या काही पात्रांसाठी अनेक भाषांमध्ये डबिंगही केले आहे. पण एकाच चित्रपटातील एकाच व्यक्तिरेखेसाठी 5 वेगवेगळ्या भाषांमध्ये डबिंग करणे माझ्यासाठी पहिलेच आहे. तेलुगु, कन्नड, तमिळ, हिंदी आणि अर्थातच मल्याळम. आणि तो किती अप्रतिम चित्रपट आहे! देवा आणि वरदा तुम्हाला २२ डिसेंबर 2023 रोजी जगभरातील थिएटरमध्ये भेटेल!”
होम्बले फिल्म्स निर्मित, सालार: पार्ट १ सीझफायर चित्रपट निर्माते प्रशांत नील यांनी दिग्दर्शित केला आहे आणि यात प्रभास, श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन आणि जगपती बाबू आहेत. हा चित्रपट २२ डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
View this post on Instagram
A post shared by Prithviraj Sukumaran (@therealprithvi)
View this post on Instagram
A post shared by Hombale Films (@hombalefilms)
View this post on Instagram
A post shared by Prithviraj Sukumaran (@therealprithvi)
The post Salaar Movie : पृथ्वीराज सुकुमारनने ‘सालार’चे डबिंग केले पूर्ण appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅन इंडियाचा सुपरस्टार प्रभास स्टारर यावर्षीचा बहुप्रतीक्षित चित्रपट सालार : पार्ट १ सीझफायर रिलीजच्या दिशेने वाटचाल करत आहे. (Salaar Movie) नुकत्याच रिलीज झालेल्या ट्रेलरने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. आता पृथ्वीराज सुकुमारन यांनी तेलुगू, कन्नड, तमिळ, हिंदी आणि मल्याळम या पाचही भाषांमध्ये चित्रपटाचे डबिंग पूर्ण केल्याचे अपडेट समोर आली आहे. (Salaar Movie) …
The post Salaar Movie : पृथ्वीराज सुकुमारनने ‘सालार’चे डबिंग केले पूर्ण appeared first on पुढारी.