परभणी: अवकाळी पावसामुळे ताडकळस परिसरात दुबार पेरणीचे संकट
ताडकळस, पुढारी वृत्तसेवा : मागील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आता शेतकऱ्यांना कोवळे पीक मोडून नव्याने हरभरा, ज्वारी, गव्हाची पेरणी करावी लागणार आहे. त्यासाठी दुबार पेरणीचा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार आहे.
ताडकळस व परिसरातील कळगाव, कळगाववाडी, धानोरा काळे, बानेगाव, महागाव, मुंबर, फुलकळस, खंडाळा, माखणी, खाबेगाव, एकरुखा, निळा, सिरकळस, बलसा, गोळेगाव, माहेर येथे हरभरा पिकाचे २७ व २९ नोव्हेंबरच्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हरभरा पीक पूर्णपणे वाया गेले आहे. या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी सुरू केली आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे शासनाने अद्यापही केलेले नाहीत.
पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी ताडकळस व परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. यावर्षी कमी पाऊस झाल्याने खरीपातील कापूस, तूर पिकांचेही नुकसान झाले आहे. तर अवकाळी पावसामुळे रब्बी तीळ करडई, ज्वारी, गहू, हरभरा पिकांचेही नुकसान झालेले आहे.
हेही वाचा
परभणी : दोन वेगवेगळ्या कारवाईत गुटख्यासह ७ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त
परभणी : कौसडी येथील विस्तार अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी सीईओ, बीडीओंना निवेदन
परभणी: १६०० रूपयांची लाच घेताना महावितरणचे २ कर्मचारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
The post परभणी: अवकाळी पावसामुळे ताडकळस परिसरात दुबार पेरणीचे संकट appeared first on पुढारी.
ताडकळस, पुढारी वृत्तसेवा : मागील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आता शेतकऱ्यांना कोवळे पीक मोडून नव्याने हरभरा, ज्वारी, गव्हाची पेरणी करावी लागणार आहे. त्यासाठी दुबार पेरणीचा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार आहे. ताडकळस व परिसरातील कळगाव, कळगाववाडी, धानोरा काळे, बानेगाव, महागाव, मुंबर, फुलकळस, …
The post परभणी: अवकाळी पावसामुळे ताडकळस परिसरात दुबार पेरणीचे संकट appeared first on पुढारी.