नाशिकमध्ये डेंग्यूबाधितांची हजारी पार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– नाशिक शहरात डेंग्यूचे थैमान सुरूच असून, डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात डेंग्यूचे ८० नवे रुग्ण आढळल्याने बाधितांचा एकूण आकडा आता १०६५वर गेला आहे. सद्यस्थितीत डेंग्यूच्या १८ रुग्णांवर मनपा तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील सूत्रांनी सांगितले. पावसाळा संपल्यानंतरही नाशिक शहरात डेंग्यूचा उद्रेक कायम राहिला आहे. महापालिकेच्या … The post नाशिकमध्ये डेंग्यूबाधितांची हजारी पार appeared first on पुढारी.
#image_title

नाशिकमध्ये डेंग्यूबाधितांची हजारी पार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– नाशिक शहरात डेंग्यूचे थैमान सुरूच असून, डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात डेंग्यूचे ८० नवे रुग्ण आढळल्याने बाधितांचा एकूण आकडा आता १०६५वर गेला आहे. सद्यस्थितीत डेंग्यूच्या १८ रुग्णांवर मनपा तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील सूत्रांनी सांगितले.
पावसाळा संपल्यानंतरही नाशिक शहरात डेंग्यूचा उद्रेक कायम राहिला आहे. महापालिकेच्या माध्यमातून युध्दपातळीवर डेंग्यू निर्मूलन मोहिम राबविली जात आहे. मात्र डासांचा प्रादूर्भाव कमी होताना दिसत नाही. आॉक्टोबरमध्ये डेंग्यूचे १९३ बाधित आढळले होते. त्यानंतर डेंग्यूचा प्रादूर्भाव कमी होईल, अशी अपेक्षा असताना डेंग्यू रुग्णसंख्येचा आकडा वाढतच गेला. नोव्हेंबरमध्ये तब्बल पाऊणेतीनशे जणांना डेंग्यूची बाधा झाली. नोव्हेबंरअखेर कोसळेल्या अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी साचलेली पाण्याची डबकी डेंग्यूच्या प्रादुर्भावास हातभार लावणारी ठरली. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच डेंग्यूचे ८९ नवे बाधित आढळले आहेत. त्यामुळे डेंग्यूबाधितांचा एकूण आकडा आता १०६५वर गेला आहे. डेंग्यू सदृश लक्षणे आढळलेल्या अद्यापही सुमारे २०० रुग्णांचे रक्तनमुने अहवाल तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहेत. हे अहवाल प्राप्त झाल्यानंतर डेंग्यू बाधितांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
एसटीच्या विभागीय नियंत्रकांना नोटीस बजावणार
डेंग्यू निर्मूलन मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या माध्यमातून घरोघरी तसेच शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांच्या परिसरात डास उत्पत्तीस्थानांचा शोध घेतला जात आहे. एन.डी. पटेल रोडवरील राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रण कार्यालय व लगतच्या बसडेपोची महापालिकेच्या मलेरिया पथकाने पाहणी केली असता गटारीचे उघडे चेंबर, वाहने धुण्यासाठी वापरले जाणाऱ्या पाण्यामुळे साचलेली डबकी यात डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे एस.टीच्या विभाग नियंत्रकांना महापालिकेच्या माध्यमातून नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती मलेरिया विभागप्रमुख डॉ. नितीन रावते यांनी दिली.
बांधकाम व्यावसायिकास दंड
शिंगाडा तलाव परिसरात एका निर्माणाधीन बांधकाम परिसरातील टाकीत डेंग्यू डासांच्या अळ्या आढळल्याने संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून पाच हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. जुन्या नाशकातील सुमन नाईक शाळा परिसरात डासांचा उच्छाद वाढल्याची तक्रार होती. डॉ. रावते यांनी या परिसराला भेट देत पाहणी केली. मात्र डासांची उत्पत्तीस्थाने आढळून आली नाहीत.
हेही वाचा :

Free Aadhaar Update Deadline Extend : अजुनही करू शकता मोफत आधार अपडेट; जाणून घ्या अंतिम मुदत आणि संपूर्ण प्रक्रिया
PEN : राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणार ‘पेन’
शेअर बाजाराची ‘सुस्त’ चाल, सेन्सेक्ससह निफ्टीमध्‍येही घसरण

The post नाशिकमध्ये डेंग्यूबाधितांची हजारी पार appeared first on पुढारी.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– नाशिक शहरात डेंग्यूचे थैमान सुरूच असून, डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात डेंग्यूचे ८० नवे रुग्ण आढळल्याने बाधितांचा एकूण आकडा आता १०६५वर गेला आहे. सद्यस्थितीत डेंग्यूच्या १८ रुग्णांवर मनपा तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील सूत्रांनी सांगितले. पावसाळा संपल्यानंतरही नाशिक शहरात डेंग्यूचा उद्रेक कायम राहिला आहे. महापालिकेच्या …

The post नाशिकमध्ये डेंग्यूबाधितांची हजारी पार appeared first on पुढारी.

Go to Source