अजुनही करू शकता मोफत आधार अपडेट; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
पुढारी ऑनलाईन डेस्क : अजुनही आधार कार्ड अपडेट न केलेल्यांना मंगळवारी संध्याकाळी मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. पुढील वर्षी १४ मार्च २०२४ पर्यंत मोफत अपडेट करता येणार आहे. UIDAI ने मोफत आधार अपडेटसाठी १४ डिसेंबर ही शेवटची तारीख ठरवली होती, जी गुरुवारी संपणार होती. पण अखेरच्या क्षणी प्राधिकरणाने मोठा निर्णय घेतला आहे.
वर्षाचा शेवटचा महिना चालू आहे आणि डिसेंबर २०२३ ही अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करण्याची अंतिम मुदत आहे. यामध्ये बँक लॉकर करारापासून अपडेट केलेले आयटीआर सबमिट करण्यापर्यंतच्या कार्यांचा समावेश आहे, जे ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाऊ शकतात. त्याचबरोबर मोफत आधार अपडेट करण्याची सुविधा उद्या म्हणजेच १४ डिसेंबर रोजी संपत होती, परंतु UIDAI ने ती तीन महिन्यांसाठी वाढवली आहे.
१० वर्ष जुने आधार असेल तर अपडेट करा
सरकारने सर्वांना १० वर्ष जुने आधार कार्ड अपडेट करण्यास सांगितले आहे. Myaadhaar पोर्टलला भेट देऊन देखील तुमची माहिती अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला माहितीशी संबंधित कागदपत्रे अपलोड करावी लागतील. याशिवाय तुम्ही हे काम ऑफलाइनही करू शकता. जर ऑनलाइन ऐवजी आधार केंद्रावर जाऊन आधार ऑफलाइन अपडेट केला तर त्याला २५ रुपये शुल्क भरावे लागेल.
आधार अपडेट करण्याची गरज का आहे?
आधार कार्ड हे भारतीयांसाठी एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे, ज्याशिवाय अनेक सरकारी आणि खाजगी कामे पूर्ण होऊ शकत नाहीत. त्याचबरोबर आधार कार्डमध्ये जुनी माहिती असेल आणि ती अपडेट केली नसेल तर तुमचे कामही अडकू शकते. याशिवाय आधार अपडेट न केल्यास, फसवणूक होण्याची शक्यताही वाढू शकते. हे पाहता केंद्र सरकारने १० वर्षे जुने आधार कार्ड अपडेट करण्यास सांगितले होते.
मोफत आधार अपडेटसाठी ऑनलाइन प्रक्रिया
https://myaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाइटवर जा.
होमपेज उघडल्यावर तुम्हाला डॉक्युमेंट अपडेटचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला What To Submit या विभागात क्लिक करावे लागेल.
त्यात सबमिट करता येणार्या सर्व कागदपत्रांचा तपशील असेल, आता सबमिट करण्यासाठी क्लिक करा वर जा.
आता तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका आणि पाठवा OTP वर क्लिक करा.
यानंतर, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर वन टाईम पासवर्ड म्हणजेच OTP येईल.
ओटीपी टाकून लॉगिन करा आणि अपडेट प्रक्रिया सुरू करा.
तुम्हाला नवीन पेजवर ‘Document Update’ वर क्लिक करावे लागेल, असे केल्यावर यूजर्सचे डिटेल्स दिसतील.
आधार वापरकर्त्यांना त्यांचे तपशील सत्यापित करावे लागतील, योग्य असल्यास, दिलेल्या हायपरलिंकवर क्लिक करा.
आता तुम्हाला ड्रॉप डाउन सूचीमधून ओळखीचा पुरावा आणि कागदपत्रांचा पुरावा निवडावा लागेल.
पत्त्याच्या पुराव्याची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा आणि सबमिट पर्यायावर क्लिक करा.
आता अपडेटेड माहितीशी संबंधित कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड कराव्या लागतील.
आधार अपडेट स्वीकारल्यानंतर, १४ अंकी अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) व्युत्पन्न होईल.
हेही वाचा :
Nashik Drought : केंद्रीय पथकाची आजपासून दुष्काळ पाहणी
संसद भवन हल्ल्यातील शहिदांना पंतप्रधान मोदींकडून आदरांजली
पराभवाचे दुःख विसरण्याचा काँग्रेसचा प्रयत्न
The post अजुनही करू शकता मोफत आधार अपडेट; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : अजुनही आधार कार्ड अपडेट न केलेल्यांना मंगळवारी संध्याकाळी मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. पुढील वर्षी १४ मार्च २०२४ पर्यंत मोफत अपडेट करता येणार आहे. UIDAI ने मोफत आधार अपडेटसाठी १४ डिसेंबर ही शेवटची तारीख ठरवली होती, जी गुरुवारी …
The post अजुनही करू शकता मोफत आधार अपडेट; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया appeared first on पुढारी.