दर 580 वर्षांनी न्यूझीलंडला धडकतात 92 फुटी लाटा?

वेलिंग्टन : न्यूझीलंडला धडकणार्‍या त्सुनामीबाबत एक नवे संशोधन झाले आहे. त्यानुसार दर 580 वर्षांनी न्यूझीलंडला 92 फूट म्हणजेच 28 मीटर उंचीच्या त्सुनामीच्या लाटा धडकतात असे दिसून आले. एखाद्या भयावह भूकंपानंतर समुद्रात अशा लाटा निर्माण होतात. न्यूझीलंडच्या उत्तर आणि दक्षिण बेटांना असलेल्या त्सुनामीच्या धोक्यांचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी भूकंप तपासणीची नवी पद्धत वापरली. त्यामध्ये त्यांना आढळले की … The post दर 580 वर्षांनी न्यूझीलंडला धडकतात 92 फुटी लाटा? appeared first on पुढारी.
#image_title

दर 580 वर्षांनी न्यूझीलंडला धडकतात 92 फुटी लाटा?

वेलिंग्टन : न्यूझीलंडला धडकणार्‍या त्सुनामीबाबत एक नवे संशोधन झाले आहे. त्यानुसार दर 580 वर्षांनी न्यूझीलंडला 92 फूट म्हणजेच 28 मीटर उंचीच्या त्सुनामीच्या लाटा धडकतात असे दिसून आले. एखाद्या भयावह भूकंपानंतर समुद्रात अशा लाटा निर्माण होतात.
न्यूझीलंडच्या उत्तर आणि दक्षिण बेटांना असलेल्या त्सुनामीच्या धोक्यांचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी भूकंप तपासणीची नवी पद्धत वापरली. त्यामध्ये त्यांना आढळले की नॉर्थ आयलंड म्हणजेच उत्तर बेटाच्या सर्वात उत्तरेकडील किनार्‍याला सर्वात मोठ्या लाटा धडकण्याचा धोका अधिक असतो. येथून जवळच असलेल्या पॅसिफिक टेक्टॉनिक प्लेट या ऑस्ट्रेलियन टेक्टॉनिक प्लेटस्च्या खाली जात असतात. त्यामुळे निर्माण होणार्‍या भूकंपामुळे समुद्रात मोठ्या त्सुनामी लाटा उसळतात.
वेलिंग्टनमधील व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटीच्या लॉरा ह्युजेस या विद्यार्थी संशोधिकेने याबाबतचे संशोधन केले आहे. न्यूझीलंड हे सबडक्शन झोनमध्ये असल्याने त्याला अशा उत्तुंग त्सुनामी लाटांचे भय नेहमीच राहिलेले आहे. दर सरासरी 580 वर्षांनी न्यूझीलंडला 92 फुटी लाटा धडकण्याचा धोका असतो. तसेच दर 77 वर्षांनी 16.4 फूट उंचीच्या त्सुनामी लाटा न्यूझीलंडला धडकू शकतात. ऑकलंडपासून ईशान्येकडे दक्षिण पॅसिफिक महासागरात 634 किलोमीटरवर 9.13 मॅग्निट्यूडचा भूकंप झाला तर 92 फूट उंचीच्या लाटा निर्माण होऊ शकतात, असे संशोधकांना आढळले.
The post दर 580 वर्षांनी न्यूझीलंडला धडकतात 92 फुटी लाटा? appeared first on पुढारी.

वेलिंग्टन : न्यूझीलंडला धडकणार्‍या त्सुनामीबाबत एक नवे संशोधन झाले आहे. त्यानुसार दर 580 वर्षांनी न्यूझीलंडला 92 फूट म्हणजेच 28 मीटर उंचीच्या त्सुनामीच्या लाटा धडकतात असे दिसून आले. एखाद्या भयावह भूकंपानंतर समुद्रात अशा लाटा निर्माण होतात. न्यूझीलंडच्या उत्तर आणि दक्षिण बेटांना असलेल्या त्सुनामीच्या धोक्यांचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी भूकंप तपासणीची नवी पद्धत वापरली. त्यामध्ये त्यांना आढळले की …

The post दर 580 वर्षांनी न्यूझीलंडला धडकतात 92 फुटी लाटा? appeared first on पुढारी.

Go to Source