पुणे : खूशखबर…15 दिवस आपण शुध्द हवा घेतली

पुणे : शहराच्या हवेची गुणवत्ता गेल्या पंधरा दिवसांपासून समाधानकारक गटात आहे. महापालिकेने तब्बल 500 आस्थापनांना नोटिसा पाठवून बांधकामाची नवी एसओपी सक्तीची केल्याने प्रदूषणात घट झाली आहे. तरीही शिवाजीनगरची हवा मात्र गेल्या काही महिन्यांपासून सतत प्रदूषित गटांत आहे. दिवाळीत शहराच्या बहुतांश भागांतील हवेची गुणवत्ता प्रदूषित गटांत होती. त्यानंतर सलग दहा ते पंधरा दिवस नागरिकांना त्याचा त्रास … The post पुणे : खूशखबर…15 दिवस आपण शुध्द हवा घेतली appeared first on पुढारी.
#image_title

पुणे : खूशखबर…15 दिवस आपण शुध्द हवा घेतली

आशिष देशमुख

पुणे : शहराच्या हवेची गुणवत्ता गेल्या पंधरा दिवसांपासून समाधानकारक गटात आहे. महापालिकेने तब्बल 500 आस्थापनांना नोटिसा पाठवून बांधकामाची नवी एसओपी सक्तीची केल्याने प्रदूषणात घट झाली आहे. तरीही शिवाजीनगरची हवा मात्र गेल्या काही महिन्यांपासून सतत प्रदूषित गटांत आहे. दिवाळीत शहराच्या बहुतांश भागांतील हवेची गुणवत्ता प्रदूषित गटांत होती. त्यानंतर सलग दहा ते पंधरा दिवस नागरिकांना त्याचा त्रास झाला.
ज्येष्ठ नागरिक दिवाळीनंतर सतत आजारी होते. त्यांना श्वसनाच्या विकारांनी त्रस्त केले होते, याबाबत दै. ‘पुढारी’ने सलग बारा दिवस वृत्तमालिका लावून या विषयाचा पाठपुरावा केला होता. त्याची दखल गांभीर्याने घेत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बांधकामांबाबत नवी स्टॅन्डर्ड ऑपरेटिव्ह सिस्टिम (एसओपी) तयार केली. त्याबाबत तब्बल 500 आस्थापनांना नोटिसा पाठवल्या. यात महामेट्रोसह शहरातील विविध बिल्डर संघटना, बांधकाम करणार्‍या अभियंता संघटनांचा समावेश होता. सर्वांनीच या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने त्याचा परिणाम दिसून आला आहे.
हवेची गुणवत्ता 300 वरून आली 80 ते 110 वर..
दिवाळीत शहराचे प्रदूषण सतत आठ दिवस 300 मायक्रोग्रॅम प्रतिक्युबिक मीटर इतके होते. त्यामुळे बाहेर पडताना ज्येष्ठांना खूप त्रास झाला. दवाखान्यात रांगा लागल्या होत्या. सर्दी, खोकला, दमा यासह श्वसनाचे विविध आजार वाढले होते. हवेच्या गुणवत्तेत आता बर्‍यापैकी सुधारणा झाली असून 300 वरून ती 80 ते 110 अशा मध्यम गटांत आली आहे.
90 टक्के भागाची हवा चांगली
शहराच्या हवेची गुणवत्ता तपासली असता असे लक्षात येते की, शिवाजीनगरची हवा अजूनही प्रदूषित गटांत आहे. तेथील हवेची गुणवत्ता 230 म्हणजे खराब गटांत आहे. मात्र, कर्वे रस्ता, विद्यापीठ रस्ता, पाषाण, आळंदी, कात्रज रस्त्यावरील हवेची गुणवत्ता 230 ते 250 वरून 80 ते 110 इतकी आली आहे.
सोमवारचे प्रदूषण
मीटर (पुणे शहर)

शिवाजीनगर : 230 (खराब)
विद्यापीठ रस्ता 150 (मध्यम)
कात्रज : 97 (शुध्द गट)
कर्वे रस्ता :121 (मध्यम)
लोहगाव :123 (मध्यम)
पाषाण : 92 (मध्यम)

सरासरी गुणवत्ता

अतिसूक्ष्म धुलिकण
(पी.एम.2.5): 69
सूक्ष्म धुलिकण
(पी.एम.10): 80 ते 140

चार महानगरांतील हवेची गुणवत्ता

दिल्ली : 300 (खराब)
पुणे : 80 ते 120 (मध्यम)
(शिवाजीनगर : 230 खराब)
मुंबई : 80 ते 130 (मध्यम)
अहमदाबाद : 80 ते 90

(समाधानकारक)
शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी आमच्या बैठका घेऊन पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिलेल्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवल्या. यात त्यांनी बांधकामाची नवी एसओपी जाहीर केली. साईटवर पत्र्यांची उंची 15 वरून 25 फूट करण्यास सांगितले. त्याचे पालन सर्व बिल्डरनी केले. तसेच रात्रीची कामे बंद करण्यात आली. साईटवर हिरव्या रंगाच्या जाळ्यांची संख्या वाढविण्यात आली.
– नंदू घाटे, अध्यक्ष, मराठी बांधकाम व्यवसाय संघटना
आम्ही शहरातील तब्बल पाचशे अस्थापनांना नोटिसा पाठविल्या. यात मेट्रोच्या कामांसह बिल्डर संघटना, विविध खोदकामे करणार्‍या अस्थापनांचा यात समावेश होता. बांधकामाच्या भोवती पत्रे अधिक उंच केले. तेथे आधी पंधरा फुटाची सक्ती होती, ती वाढवून 25 फूट करण्यात आली. तसेच मेट्रोच्या बांधकामाच्या ठिकाणी जाळ्यांची संख्या वाढवली. विनाकारण होणार्‍या खोदकामांवर नियंत्रण आणले. असे छोटे छोटे उपाय केले व अजून सुरूच आहेत.
– मंगेश दिघे, पर्यावरण अधिकारी, महापालिका, पुणे

हेही वाचा

पराभवाचे दुःख विसरण्याचा काँग्रेसचा प्रयत्न
पाकिस्तानात आत्मघातकी स्फोटात 24 सैनिक ठार
Pune News : अंगणवाडी सेविकांचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

 
The post पुणे : खूशखबर…15 दिवस आपण शुध्द हवा घेतली appeared first on पुढारी.

पुणे : शहराच्या हवेची गुणवत्ता गेल्या पंधरा दिवसांपासून समाधानकारक गटात आहे. महापालिकेने तब्बल 500 आस्थापनांना नोटिसा पाठवून बांधकामाची नवी एसओपी सक्तीची केल्याने प्रदूषणात घट झाली आहे. तरीही शिवाजीनगरची हवा मात्र गेल्या काही महिन्यांपासून सतत प्रदूषित गटांत आहे. दिवाळीत शहराच्या बहुतांश भागांतील हवेची गुणवत्ता प्रदूषित गटांत होती. त्यानंतर सलग दहा ते पंधरा दिवस नागरिकांना त्याचा त्रास …

The post पुणे : खूशखबर…15 दिवस आपण शुध्द हवा घेतली appeared first on पुढारी.

Go to Source