अखेर ठरलं… रोनाल्डो-मेस्सी ‘या’ तारखेला येणार पुन्‍हा आमने-सामने

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्याच्या घडीला फुटबॉल म्हटलं की रोनाल्डो-मेस्सी यांचे नावे समोर येतात. या दोन दिग्गजांशिवाय फुटबॉल विश्व अधुर आहे. सुमारे दोन दशकांपासून आपल्या खेळाच्या जोरावर मंत्रमुग्ध करणाऱ्या फुटबॉल चाहत्यांना मेस्सी-रोनाल्डो यांची जुगलबंधी पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. (Messi vs Ronaldo) जगातील दोन दिग्‍गज फुटबॉलपटू अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी आणि पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो … The post अखेर ठरलं… रोनाल्डो-मेस्सी ‘या’ तारखेला येणार पुन्‍हा आमने-सामने appeared first on पुढारी.
#image_title
अखेर ठरलं… रोनाल्डो-मेस्सी ‘या’ तारखेला येणार पुन्‍हा आमने-सामने


पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्याच्या घडीला फुटबॉल म्हटलं की रोनाल्डो-मेस्सी यांचे नावे समोर येतात. या दोन दिग्गजांशिवाय फुटबॉल विश्व अधुर आहे. सुमारे दोन दशकांपासून आपल्या खेळाच्या जोरावर मंत्रमुग्ध करणाऱ्या फुटबॉल चाहत्यांना मेस्सी-रोनाल्डो यांची जुगलबंधी पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. (Messi vs Ronaldo)
जगातील दोन दिग्‍गज फुटबॉलपटू अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी आणि पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. जवळपास दोन दशकांपासून सुरू असलेली ही जुगलबंदी आता सौदी अरेबियात पाहायला मिळणार आहे. अमेरिकेच्या मेजर सॉकर लीगमधील (एमएलएस) संघ इंटर मियामी आणि सौदी लीगमधील संघ अल-नासर एफसी यांच्यात सामना होणार आहे. (Messi vs Ronaldo)
एमएलएसच्या नवीन हंगामापूर्वी इंटर मियामी संघ सौदी अरेबियाला भेट देणार आहे. तिथे ते रियाध सीझन कपमध्ये खेळणार आहेत. इंटर मियामी आणि अल नसर यांच्याशिवाय अल हिलाल संघही यात सहभागी होणार आहे. अल हिलालकडे ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार जूनियर आहे. मात्र, तो बराच काळ दुखापतग्रस्त आहे. यामुळे तो सामन्यात खेळणार की नाही याबद्दल अजून संघाने माहिती दिलेली नाही. इंटर मियामीचा पहिला सामना 29 जानेवारीला अल हिलाल विरुद्ध होणार आहे. यानंतर 1 फेब्रुवारीला अल नसरशी होणार आहे. हे दोन्ही सामने रियाधमधील किंग्डन एरिना येथे होणार येथे खेळवण्यात येणार आहेत. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे.
मेस्सी विरुद्ध रोनाल्डो रेकॉर्ड
मेस्सी आणि रोनाल्डो त्यांच्या कारकिर्दीत 36 वेळा आमनेसामने आले आहेत. या कालावधीत मेस्सीने 16 वेळा विजय मिळवला आहे. तर, रोनाल्डोने 11 वेळा विजय मिळवला आहे. यामध्ये नऊ सामने अनिर्णित राहिले आहेत. या सामन्यांमध्ये मेस्सीने 22 गोल केलेत यासह त्याने 12 असिस्ट केले आहे. तर, रोनाल्डोने 21 गोल केले आहेत आणि एका असिस्ट केला आहे.
हेही वाचा :

Winter Session : विरोधात बोलायचे तर मंत्रिपद सोडा! पृथ्वीराज चव्हाण – भुजबळ यांच्यात खडाजंगी
तुळजापूर : श्री तुळजाभवानी मातेचा सोन्याचा मुकुट, मंगळसूत्र गायबप्रकरणी गुन्हा नोंद
2040 पर्यंत चंद्रावर मानव पाठविणार : इस्रो प्रमुख सोमनाथ

The post अखेर ठरलं… रोनाल्डो-मेस्सी ‘या’ तारखेला येणार पुन्‍हा आमने-सामने appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्याच्या घडीला फुटबॉल म्हटलं की रोनाल्डो-मेस्सी यांचे नावे समोर येतात. या दोन दिग्गजांशिवाय फुटबॉल विश्व अधुर आहे. सुमारे दोन दशकांपासून आपल्या खेळाच्या जोरावर मंत्रमुग्ध करणाऱ्या फुटबॉल चाहत्यांना मेस्सी-रोनाल्डो यांची जुगलबंधी पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. (Messi vs Ronaldo) जगातील दोन दिग्‍गज फुटबॉलपटू अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी आणि पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो …

The post अखेर ठरलं… रोनाल्डो-मेस्सी ‘या’ तारखेला येणार पुन्‍हा आमने-सामने appeared first on पुढारी.

Go to Source