नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या तयारीला राजकीय पक्षांनी सुरूवात केली असून महायुती-आघाडीत जागावाटपापूर्वी मतदारसंघांवर घटकपक्षांकडून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादीच्या काही इच्छूकांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतरं शिवसेने(ठाकरे गटा)ने देखील या मतदार संघावर दावा केला आहे. विशेष म्हणजे सध्या भाजपात असलेल्या एका … The post नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा appeared first on पुढारी.
#image_title

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या तयारीला राजकीय पक्षांनी सुरूवात केली असून महायुती-आघाडीत जागावाटपापूर्वी मतदारसंघांवर घटकपक्षांकडून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादीच्या काही इच्छूकांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतरं शिवसेने(ठाकरे गटा)ने देखील या मतदार संघावर दावा केला आहे. विशेष म्हणजे सध्या भाजपात असलेल्या एका नेत्याला गळाला लावण्यात ठाकरे गट यशस्वी ठरला असून या नेत्याला ‘मातोश्री’ दर्शन घडवून आणल्याने चर्चेला उधाण आले आहे.
राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगाना आणि मिझोराम या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका आटोपल्यानंतर आता लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगढमध्ये भाजपने घवघवीत यश संपादन केल्यानंतर आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक लोकभसा निवडणुकीसह एकत्रितच घेण्याची तयारी केंद्रातील भाजप सरकारकडून सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या दोन्ही निवडणुकांसाठी राजकीय पक्ष सज्ज झाले असून निवडणुकीची व्यूव्हरचना आखण्यात राजकीय नेतेमंडळी व्यस्त झाले आहेत. महायुती तसेच इंडिया आघाडीच्या बैठकांना उधाण आले आहे. जागा वाटपाची चर्चा सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मतदारसंघांवर दावे-प्रतिदावे केले जात आहेत. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पूर्व विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी भाजपकडे होती तर महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघात उमेदवार दिला होता. परंतू आता शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विभाजन होवून नवीन गट स्थापन झाले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाने देखील पुर्व विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. ठाकरे गटाने पूर्व मतदारसंघातील भाजपचा एक नेता गळाला लावत आता या मतदारसंघावर दावा केला आहे. यासाठी भाजपच्या संबंधित नेत्याला उमेदवारी देण्याबाबत ‘मातोश्री’वारीही करण्यात आल्याचे बोलले जात आहे. भाजपने मात्र याबाबत कानावर हात ठेवले आहेत.
हेही वाचा :

Nashik Cold : नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला
मराठा समाजासाठी आरक्षण मर्यादा वाढविण्याचा विचार : उपमुख्यमंत्री पवार
ऊस तोडणीकरिता पैशांची मागणी केल्यास कारवाई

The post नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा appeared first on पुढारी.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या तयारीला राजकीय पक्षांनी सुरूवात केली असून महायुती-आघाडीत जागावाटपापूर्वी मतदारसंघांवर घटकपक्षांकडून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादीच्या काही इच्छूकांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतरं शिवसेने(ठाकरे गटा)ने देखील या मतदार संघावर दावा केला आहे. विशेष म्हणजे सध्या भाजपात असलेल्या एका …

The post नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा appeared first on पुढारी.

Go to Source