देशात संविधान, लोकशाही आहे, सेन्सॉरशिप नाही : संजय राऊत

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : प्रधानमंत्री मोदी यांच्यावर टीका काही राष्ट्रीय स्वरूपाची नसते. दोन दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान पंडित नेहरूंवर अमित शहांनी टीका केली. या देशात लोकशाही, संविधान आहे, सेन्सॉरशिप लावलेली नाही, असे टीकास्त्र शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे गुन्हा दाखल … The post देशात संविधान, लोकशाही आहे, सेन्सॉरशिप नाही : संजय राऊत appeared first on पुढारी.
#image_title

देशात संविधान, लोकशाही आहे, सेन्सॉरशिप नाही : संजय राऊत

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : प्रधानमंत्री मोदी यांच्यावर टीका काही राष्ट्रीय स्वरूपाची नसते. दोन दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान पंडित नेहरूंवर अमित शहांनी टीका केली. या देशात लोकशाही, संविधान आहे, सेन्सॉरशिप लावलेली नाही, असे टीकास्त्र शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर ते माध्यमांशी बोलत होते. Sanjay Raut
राऊत म्हणाले की, राजकीय भूमिका घेऊन कोणी टीका करत असेल आणि त्यावर एखाद्या पक्षाचे कुणी अटकाव करण्याचा प्रयत्न करत असेल, तर या लोकांना आम्ही आणीबाणीविरुद्ध लढा दिला, असा डंका पिटण्याचा अधिकार नाही. एसआयटी संदर्भात छेडले असता, तुम्हाला एसआयटी स्थापन करायची असेल, हा तपास सीआयएकडे द्यायचा असेल तर द्या, केजीबीकडे द्यायचा असेल तर द्या. Sanjay Raut
केवळ आपल्या राजकीय विरोधकांच्या संदर्भात खोटे भ्रम निर्माण करायचे, बदनामी करायची आणि आपली राजकीय पोळी शेकायची हा प्रकार सुरू आहे. सध्याचे सरकार बदनामी करण्याचा कारखाना आहे. आम्ही त्यांना भीक घालत नाही. त्यांना एसआयटी स्थापन करायचे आहे. त्यांची चौकशी करा, लाखो लोक शिवसेनेत आहेत. प्रत्येकाच्या मागे एसआयटी लावा. दुसरीकडे राज्यात कायदा सुव्यवस्थेची धूळधाण उडाली आहे, मात्र याबद्दल काही बोलू नका, असेही ते म्हणाले.
2024 नंतर सरकार बदलणार आहे, कोणी सत्तेचा अमर पट्टा बांधून आलेला नाही, ही लोकशाही मधील टेम्पररी अवस्था आहे. मुंबई महापालिकेचे ऑडिट होणार असेल तर नक्कीच करा. फक्त मुंबई महानगरपालिका नाही, तर पुणे, पिंपरी- चिंचवड, नागपूर, ठाणे या सर्व महानगरपालिकांचे ऑडिट व्हायला पाहिजे. नगर विकास खात्याचे, गेल्या दीड वर्षाच्या कारभाराचे आणि व्यवहाराचे ऑडिट करा, असेही त्यांना ठणकावले. मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनामा संदर्भात बोलताना त्यांच्यावर दबाव येत होता, आधी सदस्यांनी दिले आता मागासवर्ग आयोगाचे अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्यावर दबाव येत होता. विशिष्ट अहवाल देण्यासाठी त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असा आरोप केला.
Sanjay Raut  संजय राऊतांना अटक करा; भाजपाची मागणी
नागपूर – सामना या वृत्तपत्रातून देशविरोधी व्यक्तव्य, देशद्रोहाचा गुन्हा करीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी केल्याचा आरोप करीत भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या तक्रारीवरून उमरखेड पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 153_A 505 (2) आणि 124 – A नुसार खासदार संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला. रोखठोक सदरात संपादक राऊत यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण केले. गुन्हा दाखल झाल्यावर आता राऊत यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी यवतमाळ भाजपचे जिल्हा समनव्यक नितीन भुतडा यांनी केली आहे.
हेही वाचा 

पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह लिखाण; खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल
Sanjay Raut : सोलापुरात संजय राऊत यांच्या गाडीवर चप्पलफेक
पक्ष फोडा, घर फोडा मग चारित्र्यहनन करा हीच भाजपची रणनिती : संजय राऊत यांचा हल्लाबोल

The post देशात संविधान, लोकशाही आहे, सेन्सॉरशिप नाही : संजय राऊत appeared first on पुढारी.

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : प्रधानमंत्री मोदी यांच्यावर टीका काही राष्ट्रीय स्वरूपाची नसते. दोन दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान पंडित नेहरूंवर अमित शहांनी टीका केली. या देशात लोकशाही, संविधान आहे, सेन्सॉरशिप लावलेली नाही, असे टीकास्त्र शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे गुन्हा दाखल …

The post देशात संविधान, लोकशाही आहे, सेन्सॉरशिप नाही : संजय राऊत appeared first on पुढारी.

Go to Source