पुढारी ऑनलाईन डेस्क: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध ७ ऑक्टोबरपासून सुरूच आहे. दइस्रायलकडून लेबनॉनवरील हल्ल्यात पांढऱ्या फॉस्फरसचा वापर केला आहे. यामध्ये अनेक नागरिक जखमी झाल्याचा दावा अनेक माध्यमांनी वृत्तांत केला आहे. यावर अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. (White Phosphorus)
अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्सचे समन्वयक जॉन किर्बी यांनी सोमवारी सांगितले की, अमेरिका या संदर्भात अधिक माहिती गोळा करत आहे. अमेरिका इतर देशांच्या सैन्याला पांढरा फॉस्फरस फक्त या आशेने पुरवतो की, ते त्याचा योग्य वापर करतील आणि युद्धाचे नियम पाळतील, परंतु इस्रायलकडून ‘व्हाईट फॉस्फरस’चा अशाप्रकारे करण्यात येणाऱ्या वापरावर अमेरिकेने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या व्हाईट फॉस्फरसच्या हल्ल्यात आतापर्यंत ९ नागरिक जखमी झाले आहेत. या प्रकरणाची युद्ध गुन्हा म्हणून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देखील मानवाधिकार संघटना करत आहेत, असे वृत्त मीडिया रिपोर्ट्ने दिले आहे. (White Phosphorus)
White Phosphorus: युद्धात पांढऱ्या फॉस्फरसचा वापर धोकादायक?
पांढरा फॉस्फरस हा एक रासायनिक पदार्थ आहे, जो ज्वलनशील गुणधर्मांसाठी ओळखला जातो. ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यावर हा पांढरा फॉस्फरस जळतो. सामान्यतः ते तोफखाना, बॉम्ब आणि रॉकेटमध्ये वापरलh जाते. कधीकधी याचा उपयोग शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी आणि तेजस्वी प्रकाश आणि दाट धूर तयार करण्यासाठी देखील केला जातो. परंतु जर त्याचा मोठ्या प्रमाणावर थेट मानवांवर वापर केला गेला तर मानवी शरीरासाठी हे धोकादायक ठरू शकते.
युद्धात मानवी शरीराला हानी पोहचवण्यासाठी याचा वापर केल्यास हा हाडे देखील जाळू शकतो. तसेच याच्या वापरामुळे श्वास घेण्यास त्रास जाणवू शकतो. तसेच पांढऱ्या फॉस्फरसच्या वापरामुळे अनेक मानवी अवयव निकामी होऊन प्राणघातक ठरू शकते. तसेच मानवी शरीरावर पांढरा फॉस्फरसचा प्रभाव आयुष्यभर कायम राहू शकतो, त्यामुळे युद्धादरम्यान याचा वापर धोकादायक आहे.
#IsraelHamasWar update
Israeli Army says video shows weapons inside a mosque in Gaza
US ‘concerned’ at reports Israel used white phosphorus in Lebanon attack@ShivanChanana brings you this report
Watch more: https://t.co/dm7SyC0z2e pic.twitter.com/681UqIl4qn
— WION (@WIONews) December 12, 2023
इस्रायलने आरोप फेटाळले
युद्धादरम्यान पांढरा फॉस्फरस वापरल्याचा आरोप मात्र इस्रायली लष्कराने फेटाळून लावले आहेत. इस्रायली लष्कराने मीडिया रिपोर्ट्सवर म्हटले आहे की, त्यांनी शस्त्रांमध्ये पांढरा फॉस्फरस केवळ कायदेशीररित्या वापरला आहे. इस्रायली लष्कराने पांढऱ्या फॉस्फरसने भरलेले शेल डागल्याचा दावा वृत्तांत केला जात आहे. परंतु इस्रायली लष्कराने याला स्पष्टपणे नकार दिला असून पांढऱ्या फॉस्फरसचा वापर आग लावण्याच्या उद्देशाने नसून, केवळ धूर निर्माण करण्यासाठी केला जात असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा:
निष्कारण मृत्यूला कवटाळू नका, तत्काळ शरणागती पत्करा : इस्रायलच्या पंतप्रधानांचे हमासला आवाहन
Israel-Hamas War : हमासच्या बोगद्यांत समुद्राचे पाणी सोडणार
Hamas-Israel War : इस्रायल पुन्हा राबविणार ‘ऑपरेशन रॅथ ऑफ गॉड’!
The post इस्रायलकडून युद्धात ‘पांढऱ्या फॉस्फर’चा वापर; अमेरिकेने व्यक्त केली तीव्र चिंता appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध ७ ऑक्टोबरपासून सुरूच आहे. दइस्रायलकडून लेबनॉनवरील हल्ल्यात पांढऱ्या फॉस्फरसचा वापर केला आहे. यामध्ये अनेक नागरिक जखमी झाल्याचा दावा अनेक माध्यमांनी वृत्तांत केला आहे. यावर अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. (White Phosphorus) अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्सचे समन्वयक जॉन किर्बी यांनी सोमवारी सांगितले की, अमेरिका या संदर्भात …
The post इस्रायलकडून युद्धात ‘पांढऱ्या फॉस्फर’चा वापर; अमेरिकेने व्यक्त केली तीव्र चिंता appeared first on पुढारी.