करंजी : दगडवाडीत एकाच रात्री सात ठिकाणी चोर्या
करंजी : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील दगडवाडी येथे रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एकाच रात्री सात ठिकाणी चोरट्यानी चोर्या केल्या. या प्रकाराने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. रविवारी मध्यरात्री संतोष लक्ष्मण वामन यांच्या घरासमोर लावलेली मोटरसायकल चोरीला गेली. सुखदेव बबन शिंदे, बाबासाहेब परसराम शिंदे व बाप्पू बबनराव शिंदे यांच्या घरांसमोरील प्रत्येकी एक शेळी पळविण्यात आली. महादेव निवृत्ती कराळे यांचे टेलरिंगचे दुकान फोडून नवीन कपडे व कापड लंपास करण्यात आले. तसेच विनायक यमाजी शिंदे यांचा किराणामाल चोरीला गेला.
हा संपूर्ण प्रकार सकाळी ग्रामस्थांच्या लक्षात आला. गावात एकाचवेळी सात ठिकाणी चोर्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे उपनिरीक्षक सौरभ राजगुरू यांच्यासह स्वानपथक व ठसेतज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले होते. या चोरीच्या घटनेनंतर पोपट छगन शिंदे यांच्या शेतामध्ये एक बेवारस मोटरसायकल पोलिसांना आढळून आली. ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. खंडोबा मंदिरातील दानपेटी फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दगडवाडी येथे झालेल्या सर्व चोर्यांचा पोलिसांनी तत्काळ तपास करावा, अशी सूचना माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी पोलिसांना केली. पोलिसांनी चोरट्यांचा तपास करावा, अशी मागणी सचिन शिंदे, रंगनाथ आंधळे, अजिंक्य शिंदे, सागर कराळे, मिनीनाथ शिंदे भागवत शिंदे, देवीदास शिंदे यांनी केली.
हेही वाचा
Nagar News : कपासी पिकाला अग्रीम विमा द्या : शेतकर्यांची मागणी
खडकीत एटीएम फोडण्याच्या प्रयत्न; कटर मशीन बंद पडल्याने वाचले दोन लाख
Pune News : खेड तहसील कार्यालयाबाहेरच मरण पत्करू
The post करंजी : दगडवाडीत एकाच रात्री सात ठिकाणी चोर्या appeared first on पुढारी.
करंजी : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील दगडवाडी येथे रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एकाच रात्री सात ठिकाणी चोरट्यानी चोर्या केल्या. या प्रकाराने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. रविवारी मध्यरात्री संतोष लक्ष्मण वामन यांच्या घरासमोर लावलेली मोटरसायकल चोरीला गेली. सुखदेव बबन शिंदे, बाबासाहेब परसराम शिंदे व बाप्पू बबनराव शिंदे यांच्या घरांसमोरील प्रत्येकी एक शेळी पळविण्यात आली. …
The post करंजी : दगडवाडीत एकाच रात्री सात ठिकाणी चोर्या appeared first on पुढारी.