एकेकाळी होते बस कंडक्टर, आज कोट्यवधींची संपत्ती पाहून फुटेल घाम

पुढारी ऑनलाईन डेस्क : रजनीकांत आज आपला ७३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० मध्ये बंगळुरुच्या म्हैसूरमध्ये झाला होता. (HBD Rajinikanth ) रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असे आहे. रजनीकांत यांनी शाळेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक नोकऱ्या केल्या. सुरुवातीच्या काळात त्यांनी कुलीचे कामदेखील केले. यानंतर त्यांना बंगळुरु ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमध्ये … The post एकेकाळी होते बस कंडक्टर, आज कोट्यवधींची संपत्ती पाहून फुटेल घाम appeared first on पुढारी.
#image_title

एकेकाळी होते बस कंडक्टर, आज कोट्यवधींची संपत्ती पाहून फुटेल घाम

पुढारी ऑनलाईन डेस्क : रजनीकांत आज आपला ७३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० मध्ये बंगळुरुच्या म्हैसूरमध्ये झाला होता. (HBD Rajinikanth ) रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असे आहे. रजनीकांत यांनी शाळेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक नोकऱ्या केल्या. सुरुवातीच्या काळात त्यांनी कुलीचे कामदेखील केले. यानंतर त्यांना बंगळुरु ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमध्ये बस कंडक्टरची नोकरी मिळाली होती. अनेक वर्षे त्यांनी एक कंडक्टर म्हणून काम केले. नोकरी करत असतानाही त्यांनी नाटकांमध्ये भाग घेणे सुरुच ठेवले. (HBD Rajinikanth)
संबंधित बातम्या –

Tripti Dimri : ‘रात्रीची झोप उडालीय, इंटिमेट सीन्सनंतर रात्रीत बदलले आयुष्य’

Kaun Banega Crorepati 15 : बीडचे विश्वास डाकेच्या जिद्दीने अमिताभ बच्चनही प्रेरित

Parineeti Chopra : लग्नानंतर परिणीतीचा पहिला ख्रिसमस; जय्यत तयारी

पहिल्या चित्रपटासाठी मिळाले होते २ हजार रुपये
आज रजनीकांत कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत. पहिल्या चित्रपटासाठी त्यांना केवळ २ हजार रुपये मिळाले होते. एका बस कंडक्टरपासून आपल्या करिअरची सुरुवात करणारे आणि चित्रपट इंडस्ट्रीवर राज करणाऱ्यांपर्यंत त्यांचा दीर्घ प्रवास संघर्षमय आहे.
आज साऊथ चित्रपट इंडस्ट्रीतील सर्वात महाग अभिनेत्यांपैकी एक रजनीकांत आहेत. त्यांनी इंडस्ट्रीमध्ये केवळ २ हजार रुपयांपासून सुरुवात केली होती. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबत त्यांनी एका चित्रपटात काम केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी सावत्र मुलाची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी तयांना २००० रुपये मिळाले होते.
रजनीकांत यांची संपत्ती
आज रजनीकांत एका चित्रपटासाठी १०० कोटी रुपये घेतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रजनीकांत यांची संपत्ती ४३० कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्यादेखील आहेत. ६.५ कोटींची रॉयस फँटम, ६ कोटींची रोल्स रॉयस घोस्ट बीएमडब्ल्यू एक्स, मर्सिडीज-बेंज, जी वॅगन, लेम्बोर्गिनी अशा अनेक गाड्यांचा ताफा त्यांच्याकडे आहेत. सोबतच रजनीकांत यांच्या घराची किंमत जवळपास ३५ कोटी आहे.

नव्या चित्रपटाची प्रतीक्षा
ते शेवटचा चित्रपट जेलरमध्ये दिले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केलं होतं. रिपोर्टनुसार, या चित्रपटासाठी त्यांनी ११० कोटी रुपये मानधन घेतलं होतं. जेलरचा प्रॉफिट शेअरदेखील मिळाला जो २१० कोटी रुपये होता. आता रजनीकांत थलाइवा १७० आणि लाल सलाम चित्रपटात दिसणार आहेत.
(photo -rajinikanth_fans_association insta वरून साभार)

 

View this post on Instagram

 
A post shared by A.I.R.F.A (@rajinikanth_fans_association)

The post एकेकाळी होते बस कंडक्टर, आज कोट्यवधींची संपत्ती पाहून फुटेल घाम appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : रजनीकांत आज आपला ७३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० मध्ये बंगळुरुच्या म्हैसूरमध्ये झाला होता. (HBD Rajinikanth ) रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असे आहे. रजनीकांत यांनी शाळेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक नोकऱ्या केल्या. सुरुवातीच्या काळात त्यांनी कुलीचे कामदेखील केले. यानंतर त्यांना बंगळुरु ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमध्ये …

The post एकेकाळी होते बस कंडक्टर, आज कोट्यवधींची संपत्ती पाहून फुटेल घाम appeared first on पुढारी.

Go to Source