तुझी माझी जमली जोडी : अस्मिता देशमुख- संचित चौधरीची नवी मालिका भेटीला
पुढारी ऑनलाईन डेस्क : एक ही शब्द न बोलता डोळ्यातील भाव ओळखणारी मैत्री जर नशिबात असेल तर तुम्ही जगातील सर्वात नशिबवान व्यक्ती आहात. नशिबात मैत्रीची साथ असेल तर सारं काही शक्य असतं. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मैत्री ही उलगडत जाते, फुलत जाते आणि नकळतपणे खूप काही शिकवून जाते. अशाच मैत्रीची सुंदर गोष्ट सन मराठी वाहिनीवर उलगडणार आहे. अभिनेत्री अस्मिता देशमुख आणि अभिनेता संचित चौधरी यांची ‘तुझी माझी जमली जोडी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.
संबंधित बातम्या
Tripti Dimri : ‘रात्रीची झोप उडालीय, इंटिमेट सीन्सनंतर रात्रीत बदलले आयुष्य’
New Marathi Song : ‘कसे विसरू’ गाण्यात कोकण कन्या अंकिता वालावलकर-विवेक सांगळेची जोडी
सातव्या मुलीची सातवी मुलगी : कलियुगातील विरोचकाशी नेत्राचा सामना होणार
‘मैत्री श्रीमंतीचा नाही तर मनाचा मोठेपणा बघते’ हे वाक्य पटवून देण्यासाठी ११ डिसेंबरपासून ‘तुझी माझी जमली जोडी’ ही नवीन मालिका आली आहे. दोन अनोळखी व्यक्ती, त्यांच्यात झालेली मैत्री, मैत्रीच्या नात्यामुळे त्या दोघांमध्ये झालेले विचारांचे आदान -प्रदान आणि मैत्रीमुळेच फुलणारं त्यांचं प्रेम अशी या मालिकेची गोड गोष्ट आहे. अभिनेत्री अस्मिता देशमुख आणि अभिनेता संचित चौधरी ही नवीन जोडी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहेत. नुकतेच या मालिकेचे प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे आणि हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी आतुरता शिगेला पोहोचली आहे.
‘तुझी माझी जमली जोडी’ मध्ये अभिनेत्री स्नेहलता वसईकर खलनायिकेची भूमिका साकारणार आहे. स्नेहलता वसईकर साकारणार असलेल्या भूमिकेचं नाव ‘भैरवी’ आहे. भैरवी ही संचित चौधरीची आत्या दाखवली आहे. श्रीमंत घराण्याला शोभेल असं दिमाखदार, सुंदर व्यक्तिमत्त्व, शिष्टाचाराने वागेल असा स्वभाव, आणि अर्थात श्रीमंतीचा गर्व असणारं असं हे ‘भैरवी’चं पात्र आहे. यापूर्वी कधीही न पाहिलेल्या भूमिकेत स्नेहलता वसईकर यांना पाहणं रंजक ठरणार आहे.
The post तुझी माझी जमली जोडी : अस्मिता देशमुख- संचित चौधरीची नवी मालिका भेटीला appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : एक ही शब्द न बोलता डोळ्यातील भाव ओळखणारी मैत्री जर नशिबात असेल तर तुम्ही जगातील सर्वात नशिबवान व्यक्ती आहात. नशिबात मैत्रीची साथ असेल तर सारं काही शक्य असतं. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मैत्री ही उलगडत जाते, फुलत जाते आणि नकळतपणे खूप काही शिकवून जाते. अशाच मैत्रीची सुंदर गोष्ट सन मराठी वाहिनीवर उलगडणार …
The post तुझी माझी जमली जोडी : अस्मिता देशमुख- संचित चौधरीची नवी मालिका भेटीला appeared first on पुढारी.