पुढारी ऑनलाईन डेस्क : कोकण कन्या अभिनेत्री अंकिता वालावलकर आणि विवेक सांगळे यांची जोडी ‘कसे विसरू’ या गाण्यात पाहायला मिळाली आहे. या गाण्याची निर्मिती प्रणिल आर्ट्सने केली आहे. अनेक वर्षांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं, नातं बहरु लागतं आणि मग नको असलेलं एक नवं वळण येतं आणि सर्वकाही संपून जातं? याप्रमाणे कथानक गाण्यात पाहायला मिळत आहे. ( New Marathi Song )
संबंधित बातम्या
सातव्या मुलीची सातवी मुलगी : कलियुगातील विरोचकाशी नेत्राचा सामना होणार
चंदीगढ करे आशिकी : आयुष्यमान-वाणी कपूरच्या चित्रपटाची दोन वर्षे
Kaun Banega Crorepati 15 : बीडचे विश्वास डाकेच्या जिद्दीने अमिताभ बच्चनही प्रेरित
“दादर अभिमान गीता”च्या अभूतपूर्व यशानंतर प्रणिल आर्ट्स या निर्मिती संस्थेचा हा तिसरा व्हिडिओ आहे. ‘कसे विसरू’ या अनोख्या गाण्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. गाण्याची पटकथा, दिग्दर्शन, मांडणी ही प्रणिल हातिसकरने केली आहे. तसेच प्रख्यात गायक केवल वाळंज याच्या सुमधुर आवाजात हे गाणं स्वरबद्ध केले आहे.
या गाण्यातून आपल्या सर्वांची लाडकी कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावलकर व सध्याचा मराठी मालिकांमधील आघाडीचा अभिनेता विवेक सांगळे अशी नवीन जोडी आपल्या भेटीला आली. ही दोघांची जोडी फार सुरेख दिसत असून त्यांचा अभिनय सुद्धा साजेसा आहे. ( New Marathi Song )
The post ‘कसे विसरू’ गाण्यात कोकण कन्या अंकिता वालावलकर-विवेक सांगळेची जोडी appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : कोकण कन्या अभिनेत्री अंकिता वालावलकर आणि विवेक सांगळे यांची जोडी ‘कसे विसरू’ या गाण्यात पाहायला मिळाली आहे. या गाण्याची निर्मिती प्रणिल आर्ट्सने केली आहे. अनेक वर्षांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं, नातं बहरु लागतं आणि मग नको असलेलं एक नवं वळण येतं आणि सर्वकाही संपून जातं? याप्रमाणे कथानक गाण्यात पाहायला मिळत आहे. …
The post ‘कसे विसरू’ गाण्यात कोकण कन्या अंकिता वालावलकर-विवेक सांगळेची जोडी appeared first on पुढारी.