पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह लिखाण; संजय राऊतांवर गुन्हा
उमरखेड, पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अक्षेपार्ह लिखान केल्यावरुन उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राऊत हे नेहमीच त्यांच्या वक्तव्याने चर्चेत असतात. संजय राऊत हे रोज पत्रकार परिषदेतून सरकारवर टीकेचे झोड उठवतात. त्यांच्या पत्रकार परिषदेवरून विरोधक नेहमीच त्यांना घेरण्याचा प्रयत्न करत असतात. तर सामना या ठाकरे गटाच्या मुखपत्रातील अग्रलेख किंवा रोखठोक सदरातून संजय राऊत हे मोदी सरकार, भाजपवर निशाणा साधत असतात. मात्र आता संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
कारण पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह लिखाण केल्यावरून खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमरखेड पोलीस ठाण्यात भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतड यांनी संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दिली होती. ‘सामना’ या वृत्तपत्रातून देशविरोधी वक्तव्य करून देशद्रोहाचा गुन्हा करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी केल्याचा आरोप भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी केला होता. इतकेच नाहीतर या तक्रारीवरून संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
Nagpur, Maharashtra: Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut on a case registered against him for objectionable writeup against PM in ‘Saamana’; says, “We have respect for PM Narendra Modi…Amit Shah made remarks on Former PM Jawaharlal Nehru a few days earlier, will a case get… pic.twitter.com/hfYGIwsRR5
— ANI (@ANI) December 12, 2023
हेही वाचा :
तुळजाभवानी देवीचा गहाळ झालेला मुकुट अखेर सापडला
Sushma Andhare : फडणवीसांनी सुरु केलेला खेळ उद्धव ठाकरे संपवतील : सुषमा अंधारे
अभिमानास्पद : आकाशातील तार्याला जी. ए. कुलकर्णी यांचे नाव
The post पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह लिखाण; संजय राऊतांवर गुन्हा appeared first on पुढारी.
उमरखेड, पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अक्षेपार्ह लिखान केल्यावरुन उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राऊत हे नेहमीच त्यांच्या वक्तव्याने चर्चेत असतात. संजय राऊत हे रोज पत्रकार परिषदेतून सरकारवर टीकेचे झोड उठवतात. त्यांच्या पत्रकार परिषदेवरून विरोधक नेहमीच त्यांना घेरण्याचा प्रयत्न करत असतात. तर …
The post पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह लिखाण; संजय राऊतांवर गुन्हा appeared first on पुढारी.