तुळजाभवानी देवीचा गहाळ झालेला सोन्याचा मुकुट अखेर सापडला

तुळजापूर; पुढारी वृत्तसेवा : श्री तुळजा भवानी मातेच्या ऐतिहासिक सोने चांदीच्या दागिण्यांमधून देवीचा मुकुट गायब झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवर झाडाझडती सुरू झाली होती. अखेर तुळजाभवानी देवीचा हा प्राचीन मुकुट सापडल्याचे रविवारी समोर आले आहे. ११ डिसेंबर रोजी मंदिरातील १६ सदस्य असलेली मोजणी समितीने जुन्या तांब्याच्या पेटीतील मुकुट व मंदिराने सन १९६३ साली काढलेला … The post तुळजाभवानी देवीचा गहाळ झालेला सोन्याचा मुकुट अखेर सापडला appeared first on पुढारी.
#image_title

तुळजाभवानी देवीचा गहाळ झालेला सोन्याचा मुकुट अखेर सापडला

तुळजापूर; पुढारी वृत्तसेवा : श्री तुळजा भवानी मातेच्या ऐतिहासिक सोने चांदीच्या दागिण्यांमधून देवीचा मुकुट गायब झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवर झाडाझडती सुरू झाली होती. अखेर तुळजाभवानी देवीचा हा प्राचीन मुकुट सापडल्याचे रविवारी समोर आले आहे.
११ डिसेंबर रोजी मंदिरातील १६ सदस्य असलेली मोजणी समितीने जुन्या तांब्याच्या पेटीतील मुकुट व मंदिराने सन १९६३ साली काढलेला फोटोतील मुकुट तोच आहे का, याची खातरजमा मुंबईतील प्रसिद्ध शासकीय सोने मुल्यांकन सदस्य तथा सुवर्णकार पुरूषोत्तम काळे यांनी केली. गहाळ म्हणून चर्चेत आलेला मुकुट हा तोच आहे, अशी ओळख पटल्यानंतर या संदर्भात खुलासा करण्यात आला आहे. सर्व समिती सदस्यांचे एकमत होवून गहाळ झालेला देविचा सुवर्ण मुकुट हाच असल्याचे मत झाले. त्यानुसार जिल्हाधिकारी यांना तसा अहवाल तयार करून देण्यात आला आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी उमरगा तथा अध्यक्ष सोने चांदी मोजणी समितीचे पवार, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, तहसिलदार सोमनाथ माळी, महंत चिलोजीबुवा, पाळकर मंडळाचे विपीन शिंदे, उपाध्ये मंडळाचे अनंत कोंडो, नायब तहसिलदार अमीत भारती, सहाय्यक धर्मादाय आयुक्त प्रतिनिधी ओहळ आर.डी., लेखाधिकारी सिद्धेश्वर शिंदे, मंदीर धार्मिक सह व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतोले, विधिज्ञ विश्वास डोईफोडे आदी. हजर होते.
देवस्थान समितीचे ढिसाळ व्यवस्थापन
तुळजाभवानी देवीचा प्राचीन मुकुट गायब झाल्याची नोंद आली कशी आणि यासंदर्भात प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा झाल्यानंतर सदर मुकुट कोणत्या लाकडी पेटीमध्ये कसा सापडला, याविषयी तुळजापुरात चर्चेला उधान आले आहे. या निमित्ताने श्री तुळजाभवानी देवस्थानचा गलथान कारभार आणि ढिसाळ व्यवस्थापन समोर आले आहे. अत्यंत मौल्यवान आणि देवीच्या अलंकाराच्या बाबत घडलेला हा प्रकार सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा आहे.
The post तुळजाभवानी देवीचा गहाळ झालेला सोन्याचा मुकुट अखेर सापडला appeared first on पुढारी.

तुळजापूर; पुढारी वृत्तसेवा : श्री तुळजा भवानी मातेच्या ऐतिहासिक सोने चांदीच्या दागिण्यांमधून देवीचा मुकुट गायब झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवर झाडाझडती सुरू झाली होती. अखेर तुळजाभवानी देवीचा हा प्राचीन मुकुट सापडल्याचे रविवारी समोर आले आहे. ११ डिसेंबर रोजी मंदिरातील १६ सदस्य असलेली मोजणी समितीने जुन्या तांब्याच्या पेटीतील मुकुट व मंदिराने सन १९६३ साली काढलेला …

The post तुळजाभवानी देवीचा गहाळ झालेला सोन्याचा मुकुट अखेर सापडला appeared first on पुढारी.

Go to Source