बारामती : रिक्षांवरील भोंग्यांचा व्यावसायिकांच्या कानाला ताप

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती शहरात रिक्षांवर भोंगा लावत कर्णकर्कश आवाज केला जात आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत फिरणार्‍या या रिक्षांमुळे स्थानिक व्यावसायिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. बारामती नगरपरिषद व बारामती शहर पोलिसांनी यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक व्यापार्‍यांनी केली आहे. शहरातील भिगवण रस्ता व मुख्य चौकात सध्या परप्रांतीय व्यावसायायिकांनी दुकाने … The post बारामती : रिक्षांवरील भोंग्यांचा व्यावसायिकांच्या कानाला ताप appeared first on पुढारी.

बारामती : रिक्षांवरील भोंग्यांचा व्यावसायिकांच्या कानाला ताप

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती शहरात रिक्षांवर भोंगा लावत कर्णकर्कश आवाज केला जात आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत फिरणार्‍या या रिक्षांमुळे स्थानिक व्यावसायिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. बारामती नगरपरिषद व बारामती शहर पोलिसांनी यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक व्यापार्‍यांनी केली आहे. शहरातील भिगवण रस्ता व मुख्य चौकात सध्या परप्रांतीय व्यावसायायिकांनी दुकाने थाटात ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी जाहिरात करणारे कर्णकर्कश भोंगे लावल्यामुळे स्थानिक व्यापार्‍यांना व वाहतुकीला मोठा अडथळा होत आहे.
तसेच शहरात रिक्षांवरही भोंगे लावून मोठ्या आवाजात व्यवसायाची जाहिरात केली जाते. अगदी हॉटेलपासून ते कापड दुकान, मोबाईल दुकान, विविध प्रकारचे क्लासेस आदींच्या जाहिराती दिवसभर भोंग्याद्वारे केल्या जातात. कानठळ्या बसविणार्‍या या आवाजाचा स्थानिक व्यापारी व अन्य लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. परप्रांतीय व्यावसायिक रस्त्याच्या कडेला चारचाकी वाहन किंवा रस्त्यावर दुकान थाटत आहेत. ग्राहकही दुचाकी रस्त्यावर अस्ताव्यस्त लावून खरेदी करत असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे.
यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. भिगवण रस्ता व गर्दीच्या मुख्य चौकात हे परप्रांतीय व्यावसायिक आपली दुकान थाटून बसतात. त्यांनी लावलेल्या कर्णकर्कश आवाजाने व रस्त्यावरील वाहनांच्या आवाजाने स्थानिक व्यापार्‍यांना व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशा भोंग्यांवर कारवाई करावी तसेच कारवाईमध्ये सातत्य ठेवावे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.
हेही वाचा

चंदीगढ करे आशिकी : आयुष्यमान-वाणी कपूरच्या चित्रपटाची दोन वर्षे
Kaun Banega Crorepati 15 : बीडचे विश्वास डाकेच्या जिद्दीने अमिताभ बच्चनही प्रेरित
मुख्यमंत्र्यांनी रचला माझ्‍यावरील हल्‍ल्‍याचा कट : केरळच्‍या राज्‍यपालांचा आरोप

The post बारामती : रिक्षांवरील भोंग्यांचा व्यावसायिकांच्या कानाला ताप appeared first on पुढारी.

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती शहरात रिक्षांवर भोंगा लावत कर्णकर्कश आवाज केला जात आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत फिरणार्‍या या रिक्षांमुळे स्थानिक व्यावसायिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. बारामती नगरपरिषद व बारामती शहर पोलिसांनी यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक व्यापार्‍यांनी केली आहे. शहरातील भिगवण रस्ता व मुख्य चौकात सध्या परप्रांतीय व्यावसायायिकांनी दुकाने …

The post बारामती : रिक्षांवरील भोंग्यांचा व्यावसायिकांच्या कानाला ताप appeared first on पुढारी.

Go to Source