चंदीगढ करे आशिकी : आयुष्यमान-वाणी कपूरच्या चित्रपटाची दोन वर्षे
पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या ‘चंदीगढ करे आशिकी’ या चित्रपटाला दोन वर्ष पुर्ण झाली असून चित्रपटाने चाहत्यांना भूरळ घातली आहे. उत्तम दिग्दर्शन आणि अभिषेक कपूर यांच्या उत्तम कथा आणि एक हृदयस्पर्शी प्रेमकथा त्यांनी या चित्रपटात मांडली होती. “रॉक ऑन!!’, ‘काई पो चे’ आणि “केदारनाथ’, ‘चंदीगढ करे आशिकी’ या अभिषेक कपूरच्या अनोख्या दिग्दर्शित चित्रपटाची कायम चर्चा झाली. कथाकथनाचे आणि भावनांना सुंदरपणे मिश्रण हे त्यांना अचूकपणे टिपता आलं.
संबंधित बातम्या
Parineeti Chopra : लग्नानंतर परिणीतीचा पहिला ख्रिसमस; जय्यत तयारी
Salaar : ‘सालार’मध्ये केजीएफ स्टार यशचा कॅमियो, तीर्था सुभाषचा खुलासा
Animal Collection : दहाव्या दिवशी ‘अॅनिमल’ नं तोडला ‘गदर २’ चा रेकॉर्ड; ७०० कोटींचा टप्पा पार
चित्रपटाला नुकतेच दोन वर्ष झाल्याने अभिषेक कपूरने सांगितले आहे की, “चित्रपट रिलीज होऊन दोन वर्षे झाली आहेत. ट्रान्सजेंडर समुदायाच्या जीवनावर प्रकाश टाकणारी ही कथा शेअर केल्याबद्दल मला कायम अभिमान वाटतो. LGBTQAI+ समाजासाठी असलेला हा चित्रपट एक वेगळ्या उंचीवर गेला आणि प्रेक्षकांनी त्याला प्रेम दिलं.”
तसेच सिनेमॅटिक अनुभव आणि उत्कृष्ट चित्रपटाची दोन वर्षे साजरी करत असताना अभिषेक कपूर आगामी काळात अनेक उत्तोत्तम चित्रपट साकारणार असल्याची माहिती दिली आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराणा आणि अभिनेत्री वाणी कपूरने एकत्रित स्क्रिन शेअर केली आहे.
The post चंदीगढ करे आशिकी : आयुष्यमान-वाणी कपूरच्या चित्रपटाची दोन वर्षे appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या ‘चंदीगढ करे आशिकी’ या चित्रपटाला दोन वर्ष पुर्ण झाली असून चित्रपटाने चाहत्यांना भूरळ घातली आहे. उत्तम दिग्दर्शन आणि अभिषेक कपूर यांच्या उत्तम कथा आणि एक हृदयस्पर्शी प्रेमकथा त्यांनी या चित्रपटात मांडली होती. “रॉक ऑन!!’, ‘काई पो चे’ आणि “केदारनाथ’, ‘चंदीगढ करे आशिकी’ या अभिषेक कपूरच्या अनोख्या दिग्दर्शित चित्रपटाची …
The post चंदीगढ करे आशिकी : आयुष्यमान-वाणी कपूरच्या चित्रपटाची दोन वर्षे appeared first on पुढारी.