रेशनवरील तांदळाचा काळाबाजार थांबवा : आ. यशोमती ठाकूर यांची विधानसभेत मागणी

अमरावती/नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे आणि अंत्योदय योजना तसेच गरीब कुटुंबांना देण्यात येणाऱ्या रेशनवरील तांदळामध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. चार किलो तांदूळ दिल्यामुळे तेच तांदूळ परत दुकानदार विकत घेतात आणि यातून मोठा भ्रष्टाचार होतो, असा आरोप काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदार एड. यशोमती ठाकूर यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केला. सरकारने रेशनवरील तांदळाचा काळाबाजार ताबडतोब … The post रेशनवरील तांदळाचा काळाबाजार थांबवा : आ. यशोमती ठाकूर यांची विधानसभेत मागणी appeared first on पुढारी.
#image_title

रेशनवरील तांदळाचा काळाबाजार थांबवा : आ. यशोमती ठाकूर यांची विधानसभेत मागणी

अमरावती/नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे आणि अंत्योदय योजना तसेच गरीब कुटुंबांना देण्यात येणाऱ्या रेशनवरील तांदळामध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. चार किलो तांदूळ दिल्यामुळे तेच तांदूळ परत दुकानदार विकत घेतात आणि यातून मोठा भ्रष्टाचार होतो, असा आरोप काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदार एड. यशोमती ठाकूर यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केला. सरकारने रेशनवरील तांदळाचा काळाबाजार ताबडतोब थांबवावा, अशी जोरदार मागणी आमदार ठाकूर यांनी विधानसभेत केली.
राज्यातील गोरगरीब जनतेला अन्न आणि नागरी पुरवठा विभागामार्फत रेशनवर एक किलो गहू आणि चार किलो तांदूळ पुरवले जातात. मात्र कित्येक ठिकाणी तांदळाची इतक्या प्रमाणात मागणी नाही. गोरगरीब जनतेला तांदळा ऐवजी एक किलो गहू अधिक वाढवून मिळावा अशी त्यांची मागणी आहे. मात्र, सरकारकडून एक किलो गहू आणि चार किलो तांदूळ दिले जातात. वास्तविक गोरगरीब जनतेच्या हितासाठी हा निर्णय घेतला गेलेला नाही तर हा काळा बाजार करणाऱ्या काही ठेकेदारांसाठी घेतलेला हा निर्णय आहे असा आरोप आ.ठाकूर यांनी केला. अमरावती सहा इतर ठिकाणी पकडल्या गेलेल्या रेशनच्या तांदळाचे उदाहरण देऊन आ. ठाकूर यांनी आज औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरकारला धारेवर धरले.
काळाबाजाराला प्रोत्साहन द्यायचे आहे का?
गोरगरीब जनतेला चार किलो तांदळाची खरंच गरज आहे का? याचा विचार सरकार करत नाही. चार किलो तांदळा ऐवजी गव्हाच्या प्रमाणामध्ये वाढ करायला पाहिजे. मात्र, ती केली जात नाही. कारण रेशनवर वितरित केला जाणारा तांदूळ पुन्हा काही ठेकेदारांमार्फत खरेदी केला जातो आणि मोठ्या प्रमाणात काळाबाजार या तांदळाचा केला जातो, हे जग जाहीर आहे. सरकारला या काळाबाजाराला प्रोत्साहन द्यायचे आहे का? की गोरगरीब जनतेला त्यांच्या हक्काचे धान्य द्यायचे आहे? असा सवाल करीत सरकारने हा काळाबाजार ताबडतोब थांबवावा आणि गोरगरीब जनतेच्या हितासाठी योग्य प्रमाणात त्यांना गहू आणि तांदूळ द्यावे, अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली.
The post रेशनवरील तांदळाचा काळाबाजार थांबवा : आ. यशोमती ठाकूर यांची विधानसभेत मागणी appeared first on पुढारी.

अमरावती/नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे आणि अंत्योदय योजना तसेच गरीब कुटुंबांना देण्यात येणाऱ्या रेशनवरील तांदळामध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. चार किलो तांदूळ दिल्यामुळे तेच तांदूळ परत दुकानदार विकत घेतात आणि यातून मोठा भ्रष्टाचार होतो, असा आरोप काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदार एड. यशोमती ठाकूर यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केला. सरकारने रेशनवरील तांदळाचा काळाबाजार ताबडतोब …

The post रेशनवरील तांदळाचा काळाबाजार थांबवा : आ. यशोमती ठाकूर यांची विधानसभेत मागणी appeared first on पुढारी.

Go to Source