नाशिक : जिल्हा कांदा बटाटा उत्पादक सहकारी संस्ठेच्या निवडणुकीत सहा उमेदवारांच्या हरकती फेटाळल्या
नाशिक; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याची प्रतिष्ठेची झालेल्या कांदा बटाटा उत्पादक सहकारी संघटनेच्या निवडणुकीमध्ये सोमवारी (दि. ११) अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये सहा उमेदवारांनी घेतलेल्या हरकती फेटाळण्यात आलेल्या आहेत.
गेल्या आठवड्यातील सहा उमेदवारांनी हरकतीं नोंदविल्या होत्या. उमेदवारी अर्जासाठी संघाकडून खते खरेदी व्यवहार होणे बंधनकारक आहे. मात्र, उमेदवारांनी व्यवहार केलेले नसल्याने त्यांचे अर्ज बाद करण्यात आले होते. अवैध ठरविण्यात आलेल्या संगिता दत्तात्रय ढिकले, राजाभाऊ खेमणार, संदीप गुळवे, राजेंद्र डोखळे, डाॅ. आत्माराम कुंभार्डे, सोनजकर या उमेदवाराने हरकत घेतली होती. या हरकतींवर बुधवारी (दि.7) निवडणुक अधिकारी मनीषा खैरणार यांच्यासमोर युक्तीवाद झाला होता. युक्तीवाद झाल्यानंतर निकाल राखीव ठेवला होता. सोमवारी निवडणूक अधिकारी करणार यांनी प्राप्त झालेल्या सहा हरकती फेटाळून लावल्या आहेत.
जिल्हा कांदा बटाटा उत्पादक सहकारी संघाच्या 15 जागांसाठी एकूण 105 अर्ज दाखल झाले होते. प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी झाली. यात संस्था, सोसायटी गटातून सर्वाधिक 27 अर्ज बाद झाले आहेत. अवैध अर्ज ठरल्यानंतर शुक्रवारी 48 उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द झाली आहे. यात, संस्था, सोसायटी गटात 7 जागांसाठी 9, वैयक्तीक सभासद गटात 3 जागांसाठी 6, महिला राखीव दोन जागांसाठी 7, अनु, जाती-जमाती गट 1 जागेसाठी 2, इतर मागासवर्गीय गट (ओबीसी) 1 जागेसाठी 18 तर, विशेष मागासवर्गीय गट (एनटी) 1 जागेसाठी 6 उमेदवार रिंगणात आहेत.
The post नाशिक : जिल्हा कांदा बटाटा उत्पादक सहकारी संस्ठेच्या निवडणुकीत सहा उमेदवारांच्या हरकती फेटाळल्या appeared first on पुढारी.
नाशिक; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याची प्रतिष्ठेची झालेल्या कांदा बटाटा उत्पादक सहकारी संघटनेच्या निवडणुकीमध्ये सोमवारी (दि. ११) अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये सहा उमेदवारांनी घेतलेल्या हरकती फेटाळण्यात आलेल्या आहेत. गेल्या आठवड्यातील सहा उमेदवारांनी हरकतीं नोंदविल्या होत्या. उमेदवारी अर्जासाठी संघाकडून खते खरेदी व्यवहार होणे बंधनकारक आहे. मात्र, उमेदवारांनी व्यवहार केलेले नसल्याने त्यांचे अर्ज बाद करण्यात आले …
The post नाशिक : जिल्हा कांदा बटाटा उत्पादक सहकारी संस्ठेच्या निवडणुकीत सहा उमेदवारांच्या हरकती फेटाळल्या appeared first on पुढारी.