पुढारी ऑनलाईन डेस्क : हिंदू अविभाजित कुटुंबाचा कर्ता महिलाही असू शकते, असा महत्त्वाचा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि नीला बन्सल कृष्ण यांच्या पीठाने ४ डिसेंबरला हा निकाल दिला आहे. (Delhi HC)
न्यायमूर्ती म्हणाले, “कोणताही कायदा, किंवा कोणत्याही पारंपरिक हिंदू कायद्यांनी महिलेला ‘कर्ता’ होण्यापासून रोखलेले नाही. जे अधिकार कायदा देतो, ते अधिकार सामाजिक दृष्टिकोन सांगतो म्हणून नकारता येत नाहीत.” हिंदू अविभाजित कुटुंबाचा कर्ता कोण, या संदर्भातील एका कुटुंबाचा वाद न्यायालयात गेला होता. या खटल्यात उच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. (Delhi HC)
२००५ मध्ये हिंदू वारसा कायदा १९५६मध्ये बदल करण्यात आले. त्यानुसार मुलींना वडिलार्जित मालमत्तेत समान वाटणी देण्यात आली. कायद्यातील या बदलामुळे महिला मालमत्तेतील संयुक्त वारस बनल्या. म्हणजे महिला संयुक्त वारस ठरु शकतात, पण कर्ता ठरत नाहीत असा कायद्यातील बदलांचा अर्थ लावणे म्हणजे मूळ उद्देशाला बगल देण्यासारखे आहे, असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे. (Delhi HC)
एका अविभाजित हिंदू कुटुंबाशी संबंधित हा खटला आहे. एका व्यक्तीला ५ मुलं होती. शेवटच्या मुलाचे निधन २००६ला झाले. त्यानंतर त्यांच्या वारसांमध्ये अविभाजित कुटुंबातील कर्ता कोण असा वाद सुरू झाला होता. या नातवंडात सर्वांत मोठी मुलगी होती. या मुलीला कर्ता करण्यात काही भावंडांचा विरोध होता. या वाद दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचला होता. (Delhi HC)
Woman can be ‘karta’ or head of a Hindu Undivided Family, rules Delhi HC@MandhaniApoorva reports#ThePrintLawhttps://t.co/OuNcywKGIf
— ThePrintIndia (@ThePrintIndia) December 8, 2023
हेही वाचलंत का?
Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीनचा मुलगी शोरावर प्रेमाचा वर्षाव; अनसीन व्हिडिओ व्हायरल
Manoj Jarnge Patil : मराठा आरक्षणात अडथळे आणणाऱ्यांचा दम बघणार : जरांगे-पाटलांचे भुजबळांना आव्हान
The post महिला हिंदू अविभाजित कुटुंबाची ‘कर्ता’ असू शकते : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : हिंदू अविभाजित कुटुंबाचा कर्ता महिलाही असू शकते, असा महत्त्वाचा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि नीला बन्सल कृष्ण यांच्या पीठाने ४ डिसेंबरला हा निकाल दिला आहे. (Delhi HC) न्यायमूर्ती म्हणाले, “कोणताही कायदा, किंवा कोणत्याही पारंपरिक हिंदू कायद्यांनी महिलेला ‘कर्ता’ होण्यापासून रोखलेले नाही. जे अधिकार कायदा देतो, ते …
The post महिला हिंदू अविभाजित कुटुंबाची ‘कर्ता’ असू शकते : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल appeared first on पुढारी.