आ. पडळकर चप्पलफेक निषेधार्थ इंदापूर शहरासह कडकडीत बंद

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर प्रशासकिय भवनासमोर दुध आंदोलकांना भेटण्यासाठी जाताना आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक झाल्याच्या निषेधार्थ सकल ओबीसी समाजाच्या वतीने सोमवारी(दि.११) तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. रविवारी रात्री उशिरा यातील १५ अद्यातांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. इंदापूर शहरासह तालुक्यातील भिगवण, निमगाव केतकी तसेच इतरही … The post आ. पडळकर चप्पलफेक निषेधार्थ इंदापूर शहरासह कडकडीत बंद appeared first on पुढारी.
#image_title

आ. पडळकर चप्पलफेक निषेधार्थ इंदापूर शहरासह कडकडीत बंद

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर प्रशासकिय भवनासमोर दुध आंदोलकांना भेटण्यासाठी जाताना आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक झाल्याच्या निषेधार्थ सकल ओबीसी समाजाच्या वतीने सोमवारी(दि.११) तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. रविवारी रात्री उशिरा यातील १५ अद्यातांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
इंदापूर शहरासह तालुक्यातील भिगवण, निमगाव केतकी तसेच इतरही छोट्या-मोठ्या गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
इंदापूर शहरातील बाबा चौक येथे ओबीसी बांधवांच्या वतीने आ. गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालण्यात आला. पडळकर यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा निषेध असो! अशा घोषणा देखील देण्यात आल्या.नगरपरिषदेसमोर सकल ओबीसी समाजाच्या वतीने निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ॲड. कृष्णाजी यादव म्हणाले,ज्या गावात मराठा समाजाकडून नेत्यांना गाव बंदीचे परवानगी शिवाय फलक लागले आहेत ते फलक तातडीने काढून घ्यावेत. ओबीसी एल्गार मेळाव्याला गालबोट लावण्यासाठी ज्यांनी आमदार पडळकर यांच्यावर चप्पल फेक केली त्यांना अटक करावी. पांडुरंग शिंदे म्हणाले,ओबीसी समाजाने कधी कुठे दगडफेक केली नाही.प्रशासनाने आमचा अंत पाहु नये वादविवाद होवु न देताअसे कृत्य करणाऱ्या समाजकटंकांना अटक करावी.
डॉ. शशिकांत तरंगे म्हणाले, प्रशासनास आजही ओबीसी संयमाने सहकार्य करत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील गावबंदी उठवली पाहिजे, या मागणीसाठी येत्या रविवारी(दि.१७) डिसेंबरला इंदापूरला श्रीराम चौकातून मुख्य बाजारपेठेमार्गे प्रशासकीय भवनापर्यंत विराट मोर्चा काढण्यात येणार असून यावेळी आमदार गोपीचंद पडळकर हे उपस्थित राहणार आहेत.यावेळी ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या बद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.तहसीलदार श्रीकांत पाटील,अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोइटे,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरिक्षक दिलीप पवार उपस्थित होते.
हेही वाचा :

बळीराजाला कर्जमुक्त करा, वीज बील माफ करा; विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी
Pune : अपघाती मृत्यूप्रकरणात कुटुंबीयांना 40 लाखांचा धनादेश

The post आ. पडळकर चप्पलफेक निषेधार्थ इंदापूर शहरासह कडकडीत बंद appeared first on पुढारी.

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर प्रशासकिय भवनासमोर दुध आंदोलकांना भेटण्यासाठी जाताना आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक झाल्याच्या निषेधार्थ सकल ओबीसी समाजाच्या वतीने सोमवारी(दि.११) तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. रविवारी रात्री उशिरा यातील १५ अद्यातांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. इंदापूर शहरासह तालुक्यातील भिगवण, निमगाव केतकी तसेच इतरही …

The post आ. पडळकर चप्पलफेक निषेधार्थ इंदापूर शहरासह कडकडीत बंद appeared first on पुढारी.

Go to Source