नागपूर : कांदा निर्यातबंदी प्रश्नी अमित शहा यांची भेट घेणार : उपमुख्यमंत्री
नागपूर ; पुढारी वृत्तसेवा कांदा निर्यातबंदी प्रश्ना संदर्भात आम्ही केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरींना भेटलो. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री यांच्या भेटीचे नियोजन असून, आज किंवा उद्या अमित शहा यांना भेटणार आहोत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. कांदा निर्यातबंदी प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अमित शहांना भेटणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्रिमंडळाच्या विस्तारावर बोलताना अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यावर मंत्रिमंडळाचा विस्तार लगेच होईल असे स्पष्ट केले. दरम्यान राजू शेट्टी यांच्या मागणीवर सांगलीतील कारखानदारांनी मार्ग काढावा. कोल्हापूरचा उसाचा प्रश्न सुटला आहे. मराठा आरक्षणावर बोलताना इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. शेवटी मराठा समाजाला टिकणार आरक्षण द्यायचं आहे असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
हेही वाचा :
Rajasthan New CM News : राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटेना, चर्चेचे गुर्हाळ सुरुच
PM Modi On Article 370: “अखंड भारत…” : कलम ३७० रद्द निकालाबाबत PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
Karnataka Congress Split : कर्नाटक काँग्रेसमध्ये पडणार फूट ; माजी मुख्यमंत्री कुमारस्वामींचा दावा
The post नागपूर : कांदा निर्यातबंदी प्रश्नी अमित शहा यांची भेट घेणार : उपमुख्यमंत्री appeared first on पुढारी.
नागपूर ; पुढारी वृत्तसेवा कांदा निर्यातबंदी प्रश्ना संदर्भात आम्ही केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरींना भेटलो. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री यांच्या भेटीचे नियोजन असून, आज किंवा उद्या अमित शहा यांना भेटणार आहोत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. कांदा निर्यातबंदी प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अमित शहांना भेटणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळाच्या विस्तारावर …
The post नागपूर : कांदा निर्यातबंदी प्रश्नी अमित शहा यांची भेट घेणार : उपमुख्यमंत्री appeared first on पुढारी.