मनोज जरांगे यांची धाराशिव येथील सभेत प्रकृती बिघडली
लोहारा : पुढारी वृत्तसेवा : माकणी-करजगाव (जि. धाराशिव, ता. लोहारा) येथे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सोमवारी (दि.११) सभा आयोजित केली होती. भाषणादरम्यान जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना थोडक्यात भाषण उरकावे लागले.
कार्यक्रमाला उपस्थित होण्यापूर्वीच प्रकृती बिघडली होती. तरीही जरांगे पाटील हे सभेला उपस्थिती लावण्यावर ठाम असल्याचे आयोजकांनी सांगितले. दुपारी सव्वाबारा वाजल्यानंतर सभेच्या स्थळी दाखल झाले. उन्हाची तीव्रता जास्त होती. अशातच भाषण चालू करताच मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांनी बसूनच सभेला संबोधित केले. भाषण संपताच सभा मंचावरच जरांगे पाटील यांची डॉक्टरांनी तपासणी केली. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला. परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही. प्राणांची बाजी लावून मी आरक्षणाची लढाई लढत आहे. आरक्षण लढाई अंतिम टप्प्यात आली असून आरक्षण मिळाल्याशिवाय इंचभरही मागे हटणार नाही, अशा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला.
The post मनोज जरांगे यांची धाराशिव येथील सभेत प्रकृती बिघडली appeared first on पुढारी.
लोहारा : पुढारी वृत्तसेवा : माकणी-करजगाव (जि. धाराशिव, ता. लोहारा) येथे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सोमवारी (दि.११) सभा आयोजित केली होती. भाषणादरम्यान जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना थोडक्यात भाषण उरकावे लागले. कार्यक्रमाला उपस्थित होण्यापूर्वीच प्रकृती बिघडली होती. तरीही जरांगे पाटील हे सभेला उपस्थिती लावण्यावर ठाम असल्याचे आयोजकांनी सांगितले. दुपारी सव्वाबारा …
The post मनोज जरांगे यांची धाराशिव येथील सभेत प्रकृती बिघडली appeared first on पुढारी.