जेजुरी गडावर भाविकांची प्रचंड गर्दी

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्‍या जेजुरीतील खंडोबा देवाच्या दर्शनासाठी व कुलधर्म कुलाचारसाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. जेजुरीनगरीत यात्रेचे स्वरूप निर्माण झाले होते. तर शहरातून जाणार्‍या रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. दिवाळीनंतर दररोज देवदर्शनासाठी जेजुरी गडावर मोठी गर्दी होत आहे. कार्तिक महिना संपून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. मार्गशीर्ष प्रतिपदेला जेजुरी … The post जेजुरी गडावर भाविकांची प्रचंड गर्दी appeared first on पुढारी.
#image_title

जेजुरी गडावर भाविकांची प्रचंड गर्दी

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्‍या जेजुरीतील खंडोबा देवाच्या दर्शनासाठी व कुलधर्म कुलाचारसाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. जेजुरीनगरीत यात्रेचे स्वरूप निर्माण झाले होते. तर शहरातून जाणार्‍या रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. दिवाळीनंतर दररोज देवदर्शनासाठी जेजुरी गडावर मोठी गर्दी होत आहे. कार्तिक महिना संपून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. मार्गशीर्ष प्रतिपदेला जेजुरी गडावर बुधवार (दि. 13) पासून चंपाषष्ठी उत्सवाला प्रारंभ होत आहे. त्या अनुषंगाने देवदर्शन, तळीभंडार, जागरण गोंधळ आदी कुलधर्म, कुलाचारानुसार विधी करण्यासाठी रविवारी (दि. 10) गडावर भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.
पहाटेपासूनच भाविकांनी रांगा लावून देवदर्शन घेतले. गडावर तळीभंडार तसेच पायरी मार्ग, चिंचेची बाग, पुजारी-सेवकांच्या निवासस्थानी जागरण गोंधळाचे विधी भाविक करीत होते. शहरातील सर्व दुकाने भाविकांनी फुलून गेली होती, तर शहरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. पुणे- पंढरपूर, बारामतीकडे जाणार्‍या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दररोज होणार्‍या वाहतुकीच्या कोंडीमुळे पोलिसांवर मोठा ताण निर्माण होत आहे. पुणे-पंढरपूर मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू असून जेजुरी शहरातून हा रस्ता न करता बाह्यवळण करावे, अशी नागरिक व भाविकांची मागणी आहे.
The post जेजुरी गडावर भाविकांची प्रचंड गर्दी appeared first on पुढारी.

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्‍या जेजुरीतील खंडोबा देवाच्या दर्शनासाठी व कुलधर्म कुलाचारसाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. जेजुरीनगरीत यात्रेचे स्वरूप निर्माण झाले होते. तर शहरातून जाणार्‍या रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. दिवाळीनंतर दररोज देवदर्शनासाठी जेजुरी गडावर मोठी गर्दी होत आहे. कार्तिक महिना संपून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. मार्गशीर्ष प्रतिपदेला जेजुरी …

The post जेजुरी गडावर भाविकांची प्रचंड गर्दी appeared first on पुढारी.

Go to Source