गोवा: अंगावर काँक्रिट खांब कोसळून ५ वर्षाच्या बालिकेचा मृत्यू

गोवा: अंगावर काँक्रिट खांब कोसळून ५ वर्षाच्या बालिकेचा मृत्यू

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा :  बेती – पर्वरी येथे पडीक घराचा जीर्ण झालेला काँक्रीट खांब अंगावर कोसळून ५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तनिशा सचिन दामवकर असे मृत मुलीचे नाव आहे. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी ११.१५ च्या  सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मृत मुलीच्या घरासमोर एका जमीनदोस्त झालेल्या पडक्या घराचे दोन काँक्रिटचे खांब होते. या दोन्ही खांबांना एक मजबूत वायर केबल बांधला होता. या वायरचा परिसरातील लोकांकडून कपडे वाळत घालण्यासाठी वापर केला जात होता. शिवाय या केबलच्या सहाय्याने शेजारील मुले खेळत होती.
मुलगी घटनेवेळी वायरला पकडून झोपाळे घेत होती. यावेळी जीर्ण झालेल्या त्या दोन खांबांपैकी एक खांब मुळातून कोसळला. आणि   मुलीच्या अंगावर पडला. यात मुलीच्या तोंडाला जबर जखम झाली. हा प्रकार समजताच तिच्या कुटुंबियांनी तसेच शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रूग्णवाहिका व पोलिसांना पाचारण केले. बेती पोलीस चौकीतील पोलिसांनी तिला आपल्या गाडीत घालून गोमेकॉत उपचारार्थ दाखल केले. पण तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
घटनेचा पंचनामा पर्वरी पोलिसांनी केला. अनैसर्गिक मृत्यू म्हणून हे प्रकरण नोंदवले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सर्वेश भंडारी करीत आहेत.
हेही वाचा 

घरगुती वीज वापरात गोवा देशात अव्वल
गोवा : सुमारे 87 टक्के गोमंतकीय मासे खाणारे
IFFI 2023| गोवा : ‘इफ्फी’च्या उद्घाटनाला सलमान खानला निमंत्रण

The post गोवा: अंगावर काँक्रिट खांब कोसळून ५ वर्षाच्या बालिकेचा मृत्यू appeared first on पुढारी.

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा :  बेती – पर्वरी येथे पडीक घराचा जीर्ण झालेला काँक्रीट खांब अंगावर कोसळून ५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तनिशा सचिन दामवकर असे मृत मुलीचे नाव आहे. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी ११.१५ च्या  सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मृत मुलीच्या घरासमोर एका …

The post गोवा: अंगावर काँक्रिट खांब कोसळून ५ वर्षाच्या बालिकेचा मृत्यू appeared first on पुढारी.

Go to Source