विषारी अन्न व विचार ही मोठी आव्हाने : सुधीर मुनगंटीवार
पुणे : पुढारी वृत्तसेवा : समज आणि वास्तव यांच्यातील लढाईत समाजाच्या मनातील आणि बुद्धीचा अंधार दूर करताना विषारी अन्न आणि विषारी विचार ही 21 व्या शतकातील दोन आव्हाने आहेत, ती पेलण्यासाठी भारतीयत्वाचा विचार महत्त्वाचा आहे, असे मत सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. मुनगंटीवार हे एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी उच्च शिक्षण व तंत्रज्ञानमंत्री चंद्रकांत पाटील, माधव भांडारी, भाजपचे मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये आदी उपस्थित होते.
मुनगंटीवार म्हणाले, जगाने आपल्या देशाची सहिष्णुता आणि मातीचा वैचारिक गुणधर्म ज्यात त्याग आणि सेवेची किंमत आहे आणि स्वामीपेक्षा सेवकाची पूजा केली जाते तो स्वीकार्य आहे. व्हॉट्सअॅप विद्यापीठाच्या माध्यमातून विषारी विचार पसरवले जात असून, त्याविरोधात अजून काही वर्षे वैचारिक लढाई लढावी लागेल. मी ज्या जिल्ह्यातून येतो. त्याठिकाणी पाहिलं आहे, अर्बन नक्षल आपला विचार मेंदूमध्ये अशा पद्धतीने भरत आहेत, हा विचार दिसायला समता, ममता आणि बंधुता असे वाटेल. परंतु हा विचार कधीच समता, ममता आणि बंधुतेचा ठरत नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.
काँग्रेस कधीही संपत नाही
वैचारिक लढाई ही चार-दोन दिवसात संपत नसते, ती वर्षांनुवर्षे चालत राहाते. काँग्रेस संपली असे म्हणण्यात काही अर्थ नाही, काँग्रेस कधीही संपत नाही. डाव्यांचा आणि संघाचा विचार ही संपत नाही. सध्याचा भाजपचा विचारही संपणार नाही, असे मत माधव भांडारी यांनी
मनोगतात व्यक्त केले.
The post विषारी अन्न व विचार ही मोठी आव्हाने : सुधीर मुनगंटीवार appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : समज आणि वास्तव यांच्यातील लढाईत समाजाच्या मनातील आणि बुद्धीचा अंधार दूर करताना विषारी अन्न आणि विषारी विचार ही 21 व्या शतकातील दोन आव्हाने आहेत, ती पेलण्यासाठी भारतीयत्वाचा विचार महत्त्वाचा आहे, असे मत सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. मुनगंटीवार हे एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी …
The post विषारी अन्न व विचार ही मोठी आव्हाने : सुधीर मुनगंटीवार appeared first on पुढारी.