सर्वात हलके घन एरोजेल !

न्यूयॉर्क : जगातील सर्वात हलके सॉलिड अर्थात सर्वात हलके घन म्हणून एरोजेलची ओळख आहे. अत्यंत कमी घनत्व हे एरोजेलचे ठळक वैशिष्ट्य असते आणि आश्चर्य म्हणजे त्याचे वजन फुलाच्या एका कळीपेक्षाही कमी असते. आता वजनाने हलके असले तरी एरोजिलची वैशिष्ट्ये विशेष लक्षवेधी आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर या मटेरियलचा एक व्हिडीओ शेअर केला गेला आहे. त्यात … The post सर्वात हलके घन एरोजेल ! appeared first on पुढारी.
#image_title

सर्वात हलके घन एरोजेल !

न्यूयॉर्क : जगातील सर्वात हलके सॉलिड अर्थात सर्वात हलके घन म्हणून एरोजेलची ओळख आहे. अत्यंत कमी घनत्व हे एरोजेलचे ठळक वैशिष्ट्य असते आणि आश्चर्य म्हणजे त्याचे वजन फुलाच्या एका कळीपेक्षाही कमी असते. आता वजनाने हलके असले तरी एरोजिलची वैशिष्ट्ये विशेष लक्षवेधी आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर या मटेरियलचा एक व्हिडीओ शेअर केला गेला आहे. त्यात या एरोजेलची अनेक वैशिष्ट्ये विशद करण्यात आली आहेत. पोस्ट केल्यानंतर अतिशय कमी वेळेत हा व्हिडीओ हजारो जणांनी पाहिला व लाईक केला आहे.
एरोजेल विविध प्रकारच्या केमिकल कंपाऊंडपासून तयार केले जाते. सर्वात पहिले एरोजेल 1931 मध्ये सॅम्युअल स्टीफेन्स किस्टलरने तयार केले होते. त्यावेळी त्यांनी हे एरोजेल सिलिका जेलपासून तयार केले होते. त्यानंतर अ‍ॅल्युमिना, क्रोमिया व टिन डायऑक्साईडपासूनही एरोजेल तयार करण्यात आले. आश्चर्य म्हणजे या एरोजेलमध्ये 50 टक्क्यांपासून 99.98 टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन असते.
सर्वात हलके घन आणि सर्वात कमी घनत्व असण्याबरोबरच ते एक उत्तम थर्मल इन्स्युलेटर देखील ठरत आले आहे. अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने मंगळ ग्रहावरील रोव्हर्ससाठी थर्मल इन्सुलेशनसाठी अंतराळ सूट इन्शुलेट करण्यासाठीही एरोजेलचा उपयोग केला जातो. एरोजेल डाय मटेरियलप्रमाणेही त्याचे काम चालते.

The post सर्वात हलके घन एरोजेल ! appeared first on पुढारी.

न्यूयॉर्क : जगातील सर्वात हलके सॉलिड अर्थात सर्वात हलके घन म्हणून एरोजेलची ओळख आहे. अत्यंत कमी घनत्व हे एरोजेलचे ठळक वैशिष्ट्य असते आणि आश्चर्य म्हणजे त्याचे वजन फुलाच्या एका कळीपेक्षाही कमी असते. आता वजनाने हलके असले तरी एरोजिलची वैशिष्ट्ये विशेष लक्षवेधी आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर या मटेरियलचा एक व्हिडीओ शेअर केला गेला आहे. त्यात …

The post सर्वात हलके घन एरोजेल ! appeared first on पुढारी.

Go to Source