साप्‍ताहिक राशिभविष्य : Weekly Horoscope , ११ ते १७ डिसेंबर २०२३

मेष : श्रीगणेश सांगतात की, या आठवड्यात तुम्‍ही तुमच्या धोरणांचा पुनर्विचार करून कामामध्‍ये सुधारणा करू शकाल. वारसा हक्‍काने मिळालेल्या मालमत्तेचा प्रश्न सहज सोडवला जाऊ शकतो. कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. भावनेच्‍या आहारी जावू नका. आई-वडिलांच्या किंवा कुटुंबातील ज्‍येष्‍ठांचा सल्ल्याचा आदर करा. व्यवसायाच्या विकासासाठी प्रभावशाली व्यक्तीचे सहकार्य तुमच्या संपर्कासाठी खूप फायदेशीर ठरेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहू … The post साप्‍ताहिक राशिभविष्य : Weekly Horoscope , ११ ते १७ डिसेंबर २०२३ appeared first on पुढारी.
#image_title

साप्‍ताहिक राशिभविष्य : Weekly Horoscope , ११ ते १७ डिसेंबर २०२३

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष : श्रीगणेश सांगतात की, या आठवड्यात तुम्‍ही तुमच्या धोरणांचा पुनर्विचार करून कामामध्‍ये सुधारणा करू शकाल. वारसा हक्‍काने मिळालेल्या मालमत्तेचा प्रश्न सहज सोडवला जाऊ शकतो. कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. भावनेच्‍या आहारी जावू नका. आई-वडिलांच्या किंवा कुटुंबातील ज्‍येष्‍ठांचा सल्ल्याचा आदर करा. व्यवसायाच्या विकासासाठी प्रभावशाली व्यक्तीचे सहकार्य तुमच्या संपर्कासाठी खूप फायदेशीर ठरेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहू शकते. जास्त कामामुळे थकवा येईल.

वृषभ : या आठवड्यात भावनिकतेऐवजी चातुर्याने आणि विवेकाने काम करा, कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. धार्मिक नियोजनही शक्य आहे. जास्त तणावाचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होईल. व्यवसायाची स्थिती चांगली होईल. घरात शांतता नांदेल. सांधेदुखीच्या समस्या वाढू शकतात.

मिथुन : काही समस्या असूनही या आठवड्यात तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन आणि संतुलित विचारामुळे पुढे जाण्यास सक्षम असाल. कामे वेळेवर पूर्ण कराल. कोणतीही नवीन गुंतवणूक सध्या टाळा. संपत्तीशी संबंधित हानिकारक परिस्थिती दिसून येत आहे. व्यावसायिक कामांमध्ये कुटुंबातील वरिष्ठांचा सल्ला अवश्य घ्या, जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. पोटाशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवू शकते.

कर्क : या आठवड्यात ज्ञानवर्धक आणि उत्कृष्ट साहित्य वाचण्यात वेळ व्यतीत होईल, असे श्रीगणेश सांगतात. गरजू मित्राला मदत केल्याने तुम्हाला मनःशांती लाभेल. कोणाशीही वाद घालू नका. रागावर नियंत्रण ठेवा. अप्रिय बातमी मिळाल्याने निराशा होईल. मुलांना काही समस्या असतील तर त्‍यांना वेळ द्‍या. व्यवसायाबाबत गंभीर निर्णय घ्याल. पती-पत्नीमध्ये सुरू असलेले गैरसमज दूर होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

सिंह : कंटाळवाण्या दिनचर्येपासून मुक्त होण्यासाठी तुमच्या आवडीच्या कामांमध्ये वेळ घालवा. तुमची प्रतिभा आणि योग्यता वाढवण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढेल, असे श्रीगणेश सांगतात. खराब आर्थिक स्थितीमुळे तुमचे लक्ष काही वाईट कामांकडे आकर्षित होऊ शकते. स्वत:ला सकारात्मक कार्यात गुंतवून ठेवणे चांगले. घरातील लहान समस्‍यांना जास्‍त ताणू नका. या आठवड्यात तुमची दिनचर्या तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवेल.

कन्या : गणेश सांगतात की, या आठवड्यात तुम्ही तुमचे ध्‍ये साध्‍य कराल. यामुळे तुमचा आत्‍मविश्‍वास वाढेल. प्रभावशाली लोकांशी चांगले संपर्क प्रस्थापित होऊ शकतात. आर्थिक घडामोडी मंदावल्याने चिंता वाटेल. मात्र ही परिस्‍थिती लवकरच बदलणार असल्‍याने काळजी करु नका. स्वभावात नकारात्मकता आणण्यापेक्षा स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल.

तुळ : दिवसाचा बराचसा वेळ सामाजिक आणि राजकीय कार्यात व्यतीत होईल असे गणेश सांगतात. त्याच वेळी महत्त्वाच्या लोकांशी लाभदायक संपर्क होईल. तुमच्या स्वभावामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील, असे श्रीगणेश म्‍हणतात. तरुणांनी नकारात्‍मक लोकांपासून लांब राहावे. चुकीच्या निर्णयामुळे पश्चाताप होईल. व्यावसायिक योजना यशस्वी होऊ शकतात. जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा ठेवा. गुडघे आणि पायदुखी जाणवेल.

वृश्चिक : श्रीगणेश सांगतात की, मालमत्तेच्या खरेदी-विक्रीच्या संदर्भात कामे या आठवड्यात होण्‍याची शक्‍यता. कुटुंबात धार्मिक योजना होईल. घराच्या देखभालीच्या कामातही वेळ जाईल. घरातील ज्‍येष्‍ठांच्‍या प्रकृतीची चिंता वाटू शकते. आपले विचार सकारात्मक ठेवा, तणाव टाळा. या आठवड्यात व्यवसायाची कामे सुरळीतपणे पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण आनंदाने राखता येईल. वाहनापासून जपा.

धनु : कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास राखणे हे तुमच्‍या स्‍वभावाचे वैशिष्‍ट्य आहे. तुमचा नशिबापेक्षा तुमच्या कर्मावर जास्त विश्वास असतो. कर्म केल्याने नियतीच तुम्हाला साथ देऊ लागेल, असे श्रीगणेश सांगतात. पालकांनी मुलांसोबत थोडा वेळ घालवावा. तुमच्या वैयक्तिक कृतींकडेही लक्ष द्या. व्यावसायिक क्षेत्रात सहकारी आणि कर्मचाऱ्यांचे पूर्ण सहकार्य राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. सध्याच्या वातावरणामुळे पोटाचे काही त्रास होऊ शकतात.

मकर : श्रीगणेश सांगतात की, तुम्ही काही काळासाठी ठरवलेली ध्येय साध्‍य करण्‍यासाठी हा आठवडा उत्तम आहे. तुमची धार्मिक व अध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. जवळच्या मित्राशी किंवा नातेवाईकाशी मतभेद वाढण्‍याची शक्‍यता. प्रवासापूर्वी काळजी घ्या. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.

कुंभ : घरात शिस्तबद्ध आणि आनंददायी वातावरण राहिल. दीर्घकाळ चालणाऱ्या घरगुती समस्येवरही तोडगा निघू शकतो. घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याच्या समस्यांमुळे तुमची दिनचर्या थोडी व्यस्त असू शकतेण असे श्रीगणेश म्‍हणतात. लहान मुलांचे प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. वैयक्तिक कामामुळे तुम्ही कार्यक्षेत्रात लक्ष केंद्रित करू शकणार नाही. तुमच्या जोडीदाराचा भावनिक आधार तुम्हाला मजबूत ठेवेल. अॅसिडीटीच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी योग्‍य दिनचर्या पाळा.

मीन : या आठवड्यात नवीन योजना नातेवाईकांच्या मदतीने सुरू करण्यात यश मिळेल. लग्नाशी संबंधित कुटुंबातील एखाद्यासाठी खरेदी देखील शक्य आहे. कधी कधी निर्णय घेताना गोंधळ होऊ शकतो. वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या. व्यवहार संयत ठेवा. तणावाचे परिणाम तुमची झोप खराब करू शकतात. व्यापार आणि नोकरी या दोन्हींत राजकारण असू शकते. वैवाहिक संबंध मधुर ठेवण्यासाठी तुमचे विशेष योगदान असेल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सकारात्मक राहण्यासाठी योग आणि ध्यान करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.
The post साप्‍ताहिक राशिभविष्य : Weekly Horoscope , ११ ते १७ डिसेंबर २०२३ appeared first on पुढारी.

मेष : श्रीगणेश सांगतात की, या आठवड्यात तुम्‍ही तुमच्या धोरणांचा पुनर्विचार करून कामामध्‍ये सुधारणा करू शकाल. वारसा हक्‍काने मिळालेल्या मालमत्तेचा प्रश्न सहज सोडवला जाऊ शकतो. कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. भावनेच्‍या आहारी जावू नका. आई-वडिलांच्या किंवा कुटुंबातील ज्‍येष्‍ठांचा सल्ल्याचा आदर करा. व्यवसायाच्या विकासासाठी प्रभावशाली व्यक्तीचे सहकार्य तुमच्या संपर्कासाठी खूप फायदेशीर ठरेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहू …

The post साप्‍ताहिक राशिभविष्य : Weekly Horoscope , ११ ते १७ डिसेंबर २०२३ appeared first on पुढारी.

Go to Source