रणवीर सिंहनंतर विद्युत जामवालचा न्यूड फोटोशूट; म्हणाला…
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल ( Vidyut Jammwal ) त्याच्या उत्तम अभिनयासाठी आणि स्टंटबाजीसाठी प्रसिद्ध आहे. सध्या तो एका वेगळ्याच कारणाने सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. नुकतेच विद्युतच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेना उधान आलं आहे. हे फोटो सोशल मीडियावर पाहताच नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच धारेवर धरले आहे. तर काही युजर्सना बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरची आठवण काढली आहे.
संबंधित बातम्या
Katrina-Vicky Kaushal : कॅटरिनाचा ‘तो’ न पाहिलेला व्हिडिओ अन् विकीसोबत रोमॅँटिक मूड
Animal Movie : तृप्ती डिमरीच्या इंटीमेट सीनसाठी साराने दिलं होतं ऑडिशन?; जाणून घ्या सत्य…
Animal Collection : रणबीरच्या ‘अॅनिमल’नं पकडली गती, ‘सॅम बहादूर’ची पिछेहाट; तिसऱ्या दिवशी ७१ कोटींची टप्पा पार
अभिनेता विद्युत जामवालने ( Vidyut Jammwal ) सकाळी त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक न्यूड फोटोशूट शेअर केले आहेत. या फोटोत विद्युत जामवाल पूर्णपणे न्यूड अवस्थेत दिसत असून तो हिमालयात पोहोचला आहे. शेअर केलेल्या पहिल्या फोटोत विद्युत नदीच्या काठावर पाण्यात उतरताना, दुसऱ्या फोटोत न्यूड अवस्थेत पाण्यात आंघोळ करताना आणि हात करून नमस्कार करताना दिसत आहे. तर तिसऱ्या फोटोत हिरव्यागार जंगलाच्या मध्ये चुलीवर चहा बनवताना दिसतोय. यावरून विद्युत हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये ९ ते १० दिवस एकटाच राहत असल्यचे दिसतेय.
या फोटोला त्याने भल्ली मोठी कॅप्शन लिहिली आहे. यात त्याने, हिमालय पर्वतरांगांना माझी रिट्रीट असून मागच्या १४ वर्षांपासून असेच करत असल्याचे सांगितले आहे. दरवर्षी ७ ते १० दिवस एकटं घालवणं हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर सर्वात कंफर्टेबल असून निसर्गाच्या नैसर्गिक फ्रिक्वेन्सीमध्ये ट्यून करतो असेही त्याने म्हटलं आहे.
‘ यानंतर मी जेव्हा घरी परततो तेव्हा मला हवी असलेली उर्जा घेवून येतो. माझ्या आयुष्यातील एक नवीन अध्याय अनुभवण्यासाठी मी तयार होतो. मी आता माझ्या पुढच्या अध्यायासाठी तयार आणि उत्सुक आहे. असेही त्याने सांगितले आहे. याच दरम्यान त्याने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा करताना ‘CRAKK’ हा २३ फेब्रुवारी २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत असल्याचेही सांगितले.
हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांसह बॉलिवूड कलाकारांनी त्याच्यावर कॉमेन्टसचा पाऊस पाडला आहे. दरम्यान एका युजर्सने रणवीर सिंहने २०२२ मध्ये केलेल्या न्यूड फोटोशूटची आढवण काढली आहे. तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच धारेवर धरले आहे. या फोटोला आतापर्यत ६ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.
View this post on Instagram
A post shared by Vidyut Jammwal (@mevidyutjammwal)
The post रणवीर सिंहनंतर विद्युत जामवालचा न्यूड फोटोशूट; म्हणाला… appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल ( Vidyut Jammwal ) त्याच्या उत्तम अभिनयासाठी आणि स्टंटबाजीसाठी प्रसिद्ध आहे. सध्या तो एका वेगळ्याच कारणाने सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. नुकतेच विद्युतच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेना उधान आलं आहे. हे फोटो सोशल मीडियावर पाहताच नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच धारेवर धरले आहे. तर काही युजर्सना बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरची …
The post रणवीर सिंहनंतर विद्युत जामवालचा न्यूड फोटोशूट; म्हणाला… appeared first on पुढारी.