पणजी : दुचाकीने ठोकरल्याने पादचाऱ्याचा मृत्यू

पणजी : पुढारी वृत्तसेवा सांतिनेज परिसरात दुचाकीने ठोकरल्याने स्वामी मुथ्थू या पादचारी जेष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज (रविवार) सकाळी घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या विषयी अधिक माहितीनुसार, सांतिनेज परिसरातील काकुलो मॉलजवळ स्वामी मुथ्थू नावाचे ज्येष्ठ नागरिक रस्ता ओलांडत होते, यावेळी मॉलच्या दिशेने येणाऱ्या युवतीच्या दुचाकीची त्यांना धडक बसली. पिंकी सिंग (वय 23) असे त्या युवतीचे नाव आहे.
कांपाल येथील एमआरएफ दुकानासमोर हा अपघात घडला. यामध्ये स्वामी मुथ्थू गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर त्यांना त्वरित रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तोवर त्यांचा मृत्यू झाला होता. उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, युवती बेदरकारपणे दुचाकी चालवत असल्यामुळेच हा अपघात घडला आहे. दरम्यान, युवतीविरोधात पणजी पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा :
BJP’s Chief Minister: कोण होणार मुख्यमंत्री? ३ राज्यातील भाजपच्या मुख्यमंत्र्यांची काँग्रेसलाच उत्सुकता
MP New CM : ‘सभी को राम राम…’ शिवराज सिंह चौहानांचा हात जोडलेला फोटो; ट्विटने खळबळ
BJP News : भाजप नेत्यांच्या आजच्या बैठकीनंतर ठरणार छत्तीसगडचा नवा मुख्यमंत्री; नाव होणार स्पष्ट
The post पणजी : दुचाकीने ठोकरल्याने पादचाऱ्याचा मृत्यू appeared first on पुढारी.
पणजी : पुढारी वृत्तसेवा सांतिनेज परिसरात दुचाकीने ठोकरल्याने स्वामी मुथ्थू या पादचारी जेष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज (रविवार) सकाळी घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या विषयी अधिक माहितीनुसार, सांतिनेज परिसरातील काकुलो मॉलजवळ स्वामी मुथ्थू नावाचे ज्येष्ठ नागरिक रस्ता ओलांडत होते, यावेळी मॉलच्या दिशेने येणाऱ्या युवतीच्या दुचाकीची त्यांना धडक बसली. पिंकी …
The post पणजी : दुचाकीने ठोकरल्याने पादचाऱ्याचा मृत्यू appeared first on पुढारी.
