खेळाडू निवडताना वय हा निकष नसावा, तर… : गौतम गंभीर

पुढारी ऑनलाईन डेस्क: क्रिकेट संघातून खेळाडूला वगळताना वय हा निकष नसावा, तर फॉर्म हा एकमेव निकष असावा. खेळाडूला वगळताना किंवा निवडताना वय हा निकष लावू नये, तर फॉर्म हा एकमेव निकष असावा. निवृत्ती हा देखील वैयक्तिक निर्णय आहे, खेळाडूला निवृत्तीची सक्ती कोणीही करू शकत नाही, असे मत भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर यांने एक मुलाखतीत … The post खेळाडू निवडताना वय हा निकष नसावा, तर… : गौतम गंभीर appeared first on पुढारी.
#image_title

खेळाडू निवडताना वय हा निकष नसावा, तर… : गौतम गंभीर

पुढारी ऑनलाईन डेस्क: क्रिकेट संघातून खेळाडूला वगळताना वय हा निकष नसावा, तर फॉर्म हा एकमेव निकष असावा. खेळाडूला वगळताना किंवा निवडताना वय हा निकष लावू नये, तर फॉर्म हा एकमेव निकष असावा. निवृत्ती हा देखील वैयक्तिक निर्णय आहे, खेळाडूला निवृत्तीची सक्ती कोणीही करू शकत नाही, असे मत भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर यांने एक मुलाखतीत व्यक्त केले आहे. Gautam Gambhir on Rohit Sharma
भारतीय संघाने 4 जूनपासून सुरू होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, 10 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी T20I मालिकेसाठी भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची संघात निवड केलेली नाही. या पार्श्वभूमीवर गंभीर यांने आपले मत व्यक्त केले आहे. Gautam Gambhir on Rohit Sharma
गंभीर पुढे म्हणाला की, रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये असेल, तर त्याने टी-20 वर्ल्ड कपमध्ये कर्णधारपद भूषवायला हवे. जर तो चांगल्या फॉर्ममध्ये नसेल, तर त्याची टी-20 वर्ल्ड कपसाठी निवड करू नये. कर्णधारपद ही जबाबदारी आहे. सर्वप्रथम, तुम्हाला एक खेळाडू म्हणून निवडले जाते. मग तुम्हाला कर्णधार बनवले जाते. एका कर्णधाराला प्लेइंग इलेव्हनमध्ये कायमस्वरूपी स्थान राखण्यासाठी त्याचा फॉर्म महत्त्वाचा असतो.
गंभीर म्हणाला की, 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात रोहितने दहा सामन्यांत चांगले वर्चस्व गाजवले. विश्वचषक स्पर्धेत त्याने चमकदार कामगिरी केली आहे. कर्णधार पदाच्या दबावाखाली रोहितने खूप चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर पाच आयपीएल ट्रॉफी जिंकणे सोपे नाही. सलग 10 विजयानंतर भारताला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. परंतु एका वाईट खेळामुळे रोहित शर्मा किंवा संघ वाईट संघ बनत नाही. जर तुम्ही रोहित शर्माला फक्त एका खराब खेळामुळे वाईट कर्णधार म्हणत असाल, तर ते योग्य नाही, रोहित चांगल्या फॉर्ममध्ये असेल, तर त्याने 2024 टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले पाहिजे, असे मत गंभीर यांनी व्य़क्त केले.
शेवटी निवड समितीला कोणाची निवड करायची आणि कोणाची नाही, याचा अंतिम अधिकार आहे. परंतु, शेवटी कोणत्याही खेळाडूची बॅट किंवा चेंडू काढून घेऊ शकत नाही. फॉर्मला सर्वोच्च प्राधान्य आहे, असे गंभीर म्हणाला. रोहितने एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये चमकदार कामगिरी केली आणि सलामीवीर म्हणून ‘मेन इन ब्लू’साठी महत्त्वाची भूमिका बजावली. विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होता. त्याने 11 डावांमध्ये 125.94 च्या स्ट्राइक रेटने 597 धावा केल्या आहेत.
हेही वाचा 

विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात तुफान राडा
Gautam Gambhir KKR Mentor IPL 2024 | गौतम गंभीरची शाहरुखच्या ‘केकेआर’मध्ये वापसी, मिळाली ‘ही’ जबाबदारी
Kohli vs Gambhir : गौतम गंभीरशी भांडण केल्याबद्दल विराट कोहली दंड भरणार नाही? कसं ते जाणून घ्या

The post खेळाडू निवडताना वय हा निकष नसावा, तर… : गौतम गंभीर appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क: क्रिकेट संघातून खेळाडूला वगळताना वय हा निकष नसावा, तर फॉर्म हा एकमेव निकष असावा. खेळाडूला वगळताना किंवा निवडताना वय हा निकष लावू नये, तर फॉर्म हा एकमेव निकष असावा. निवृत्ती हा देखील वैयक्तिक निर्णय आहे, खेळाडूला निवृत्तीची सक्ती कोणीही करू शकत नाही, असे मत भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर यांने एक मुलाखतीत …

The post खेळाडू निवडताना वय हा निकष नसावा, तर… : गौतम गंभीर appeared first on पुढारी.

Go to Source